पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महाराष्ट्र सरकार भरघोस आकर्षक आश्वासने देऊन सत्तारूढ झाली. यांची धोरणे देशी-विदेशी भांडवलदारांना मलिदा व सामान्यांना धत्तुरा अशी आहे. त्यामुळे सामान्यांच्या विरोधातील धोरणे राबविणाऱ्या या भ्रष्टसरकार विरोधात भारतीय कम्युनिष्ट पक्ष (मार्क्सवादी) किसान सभा व शेतमजुर युनीयनने मंगळवारी पालघर मध्ये जेलभरो आंदोलन केले.माकपचे राष्ट्रीय सहसचीव डॉ. अशोक ढवळे, जिल्हासचीव मधुकर डोवला, सुनील सुर्वे, बबलु त्रिवेदी, हिना वणगा, विलास भुपाळ, रजीत कोम इ. च्या मार्गदर्शनाखाली हजारोच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी पालघर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी काही आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. (वार्ताहर)डहाणूमध्ये ठिय्याडहाणू : वाढती महागाई, शेतकर्यांना कर्ज माफी, आदिवासींचे वनजमीनीवरचे दावे मान्य करा, कामगारांना किमान वेतन, शेतकर्यांना अनुदान दया आदि मागण्यांसाठी मंगळवारी सीपीएमचे डहाणू प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांनी आंदोलकांची केवळ नोंद करुन घेतली गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे आंदोलकांनी जेलभरो आंदोलन यशास्वी करण्यासाठी उशीरापर्यंत डहाणू प्रांत कार्यालयासमोर धरणे धरुन ठेवले होते. प्रांत अधिकारी अंजली भोसले यांना शिष्टमडळाने जाऊन भेटण्याचेही नाकारल्याचे सीपीएमचे चंद्रकांत गोरखाना यांनी सांगितले. जेलभरो करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली.वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आदिवासी बांधवांनी मंगळवारी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार व कम्युनिस्ट पक्षाचे नेते लहानू कोम, तालुका सचिव सुनील धानवा यांनी केले. खंडेश्वरी नाका येथून रॅलीला सुरुवात झाली आणि तिचे रूंपातर तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चात झाले. या मोर्चात जगन म्हसे, अनिल पाटील, प्रकाश चौधरी, चंदू धांगडा, दामोदर बात्रा, सुरेश दयात,रमा तारवी, लक्ष्मण काकड या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारविरोधात माकपाचे जेलभरो
By admin | Published: January 20, 2016 1:45 AM