मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात राहणाऱ्या तरूणांना पोलीस भरतीत करण्याच्या नावाखाली दोन भामट्यांनी १० लाख ७० हजार रू. चा चुना लावला. याबाबत गुन्हा दाखल असून मनोर पोलीस त्यांचा शोध घेत आहे. चेतन पंढरीनाथ पाटील रा. कुकडे विशाल चुरी, गोपाळ हडळ, किशोर डुकले, सचिन डबके, यांच्याकडून पोलीस भरती परिक्षेत नापास झाले तरी आम्ही तुम्हाला भरती करून घेऊ आमची वरपर्यंत ओळख आहे असे बोलून टप्प्या टप्प्याने १० लाख ७० हजार रू. किशोर कृष्णा कुडू रा. सफाळे व संभाजी कोंडीबा काटे रा. कर्जत यांनी घेतले. २०१३ साली या भामट्यांनी त्यांची फसवणूक केली हाती. तेव्हपासून चेतन पाटील व त्यांचे इतर जोडीदार हे किशोर व शंभाजी यांच्याकडे पैसे परत मिळविण्यासाठी तगादा लावित होते. परंतु दोन वर्ष पूर्ण झाले तरी त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही म्हणून ७ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.हा व्यवहार हा ताज इन हॉटेल टेन नाका व चिल्हार फाटा मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. (वार्ताहर)
फसवणूक प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
By admin | Published: October 09, 2015 11:25 PM