नालासोपारा : वसईच्या तुंगारेश्वर येथील सदानंद बालयोगी आश्रमावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होत असलेल्या कारवाईला निषेध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असतानाही नालासोपारा आचोळे रोडवरील सार्वजनिक रस्ता बंद केला म्हणून माजी महापौर रुपेश जाधव, नगरसेवक विशाल पाटील, इतर पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह ५० ते ६० स्त्री पुरुषांवर तुळींज पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवर शुक्र वारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आश्रमावर होणाº्या कारवाईच्या विरोधात माजी महापौर रुपेश जाधव, नगरसेवक विशाल पाटील, मनसेचे प्रशांत खांबे, सेनेचे नितीन चौधरी, संतोष चौधरी, जितू पाटील, हितेश मेहता व इतर ५० ते ६० स्त्री पुरुषांनी अवैध जमाव जमवून आचोळे ते नालासोपारा स्टेशनकडे जाणारा रस्ता बेकायदेशीररित्या अडविला. याबाबत माजी महापौर रुपेश जाधव यांना विचारले असता आश्रमावरील होणाºया कारवाईसाठी भक्तांसोबत निषेध दर्शवण्यासाठी जमलो होतो तसेच सदानंद महाराज हे पालघर जिल्ह्याचे श्रद्धास्थान आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही भक्ताला फसवले नसून भक्तांच्या सोबत आम्ही नेहमी उभे राहणार असून असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्याची काळजी करणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.