नालासोपारा : अर्नाळ्यातील मृत्यू पावलेल्या ५८ वर्षांच्या रुग्णाच्या कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करणाºया बंगली येथील कार्डिनल रुग्णालय आणि रुग्णाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहणाºया नातेवाइकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अर्नाळा येथील व्यावसायिक असलेल्या रु ग्णास यकृत आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे बंगलीच्या कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात १ जूनला दाखल केले होते. त्यांचा स्वाब कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. उपचारादरम्यान गुरु वारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांच्या आग्रहामुळे रुग्णालयाने मृतदेह कोरोना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा न करता त्यांच्या ताब्यात दिला.
अर्नाळा येथे सकाळच्या सुमारास या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सुमारे पाचशेहून अधिक लोक उपस्थित होता. त्यानंतर या रु ग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल हाती पडला. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. वसई-विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या तक्रारीवरून साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात वसई पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक आनंद पराड यांनी सांगितले.नातेवाइकांवरही कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश असताना सुमारे पाचशेहून अधिक लोक अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यामुळे नातेवाइकांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अंत्यसंस्कारात मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या सुमारे ३५ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी त्याचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.