वाडा/पारोळ : जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळासोबत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. सतत तीन दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, त्यानंतर जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.वाडा तसेच वसई या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर शेतकºयांना बसलाच आहे. पण, कोरोनाच्या भीतीमुळे जव्हार, मोखाडा, तलासरी, नाशिक येथील शेतमजूरही येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या वर्षी शेतमजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. काही केल्या संकटे शेतकºयांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. या वर्षी शेती करणे कठीण होऊन बसले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे शेतकरी बबन वारघडे यांनी सांगितले.रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भातरोपांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाºया कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकांमधील रोपे करपण्याची शक्यता शेतकरी घनश्याम आळशी यांनी व्यक्त केली.वसईत पेरणी झालेल्या सर्व भागातही हीच समस्या उद्भवली आहे. पावसात रोपे टिकाव धरतात, मात्र मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागत आहे. अधूनमधून एखादी सर पडते. तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत.>शेतकºयांचे आर्थिकगणित बिघडणारवसई क्षेत्रावर भातरोपलागवड झाली आहे. सर्व क्षेत्रांत चांगली रोपे उगवली असून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पैसे मोजून बी-बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे मान्सून अधिक काळ लांबल्यास शेती व शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:28 AM