वाडा : औरगाबाद येथे अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी निधी मंजूरी नंतर सुरू झालेल्या राज्यातील रस्त्याच्या विकासकामांच्या वेगासंबंधी भाष्य करताना ‘ही कामे मुंगीच्या पावलांनी चालू आहेत असे म्हटले तर, मुंगीचाही अपमान होईल’ या शब्दांत जाहिर वाभाडे काढले.तालुक्यातील कुडूस - चिंचघर - गौरापूर या रस्त्याची दयनीय अवस्था असून या रस्त्याचे काम मुंगीच्या पावलाने पुढे सरकत आहे. हे पाहून क्र ॉकीटीकरणाचा कुडूसपासूनचा टप्पा एका महिन्यात पूर्ण करण्याच्या आश्वासनाला चार महिने उलटले असाच वेग असेल तर निश्चित कधी पूर्ण होईल आणि कामाचा दर्जा तरी चांगला राहील का असा प्रश्न नागरिकांना कडून विचारला जात आहे. तर कुडूस चिंचघर ग्रामपंचायतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन यामार्गे जाणाºया दोन शाळा, कॉलेजच्या सहा हजार विद्यार्थासह आंदोलनाचा इशारा दिला आहे.कुडूस चिंचघर गौरापूर या १२ किमी लांबीच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ९ कोटी ४० लाख निधी मंजुरीनंतर जिल्ह्यÞाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाल्यावर या योजनेचे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी वेळेच्या कालमर्यादेचे बंधन पाळलेले नाही. एक वर्ष होईल काम खुपच संथगतीने सुरू असून या भागातील सर्व राजकीय पक्षांची मंडळी, ग्रामस्थ सहकार्य करीत असताना निरर्थक सबबी पुढे करून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे असा, आरोप निवेदनाद्वारे करण्याच आला आहे.२६ आॅक्टोबर २०१७ रोजी चिंचघर ग्राम पंचायत कार्यालयातील सभेमध्ये शाखा अभियंता विनोद घोलप यांनी कुडूस ते चिंचघर हा १३५० मीटरचाक्र ॉकीटीकरणाचा टप्पा एका महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात चार महिने झाले तरी ते काम पुर्ण होऊ शकलेले नाही. कुडूस चिंचघर मार्गावरून ह.वि.पाटील विद्यालय व नॅशनल इंग्लिश स्कूलचे सहा हजार विद्यार्थी रोज प्रवास करतात. बोर्डाच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत. प्रचंड धुळ, खड्डे आणि अडथळ्यांमुळे विद्यार्थी मेटाकुटीला आल्याने या दोन्ही शाळांनी कुडूस आणि चिंचघर ग्रामपंचायतींना तक्र ार करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली.
चिंचघर रस्त्याचे काम कूर्मगतीने, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:25 AM