तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील निराधार विधवा महिलांना, अपंग, वृध्द निराधार, जेष्ठ नागरिक यांना राज्य शासनाच्या कुटुंब अर्थसहाय्य, इंदिरागांधी, श्रावणबाळ, वृध्दपकाळ, संजयगांधी अशा विविध योजनेचेअंतर्गत एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ या वर्षातील विक्रमगड तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करणाऱ्या ५०७७ निराधार लाभार्थ्यांना २,०३,८३,८०० रुपयांचे अर्थसहायाचे आतापर्यत तहसीलदार सुरेश सोनावणे, निवासी तहसीलदार आयुब तांबोळी यांचे मार्गदर्शनाखाली एका वार्षात वाटप करण्यांत आल्याची माहिती या विभागाचे महसूल सहायक संतोष सोनावणे यांनी लोकमतशी बोलतांना दिली़ तालुक्यातील विविध भांगातील ५०७७ निराधार लाभार्थ्यांना विविध योजनेचे अंतर्गत अर्थसहाय योजनेतून आर्थिक मदत करण्यांत आली़ त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी लाभार्थी महिलांचा व पुरुषांचा अधिक समावेश आहे़ यामध्ये प्रमुख्याने शासनाच्या वतीने कुटुंबातील कमवत्या पुरुषाच्या(पती) निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नीला राष्ट्रीय कुटुंंब अर्थसहाय योजनेतून तहसील कार्यालयाकडे अर्जकरुन त्यांचेकडील मंजुरीनंतर शासनाकडून आर्थिक मदत दिली आहे़ या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रामुख्याने मयताचा (पती) दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, दारिद्रयरेषेखालील असल्याचा दाखला, ग्रामसेवकाचा दाखला, अर्ज असे कागदपत्रे असणाऱ्या लाभार्थ्यास प्राधान्य दिले जात आहे़ परंतु हया योजनेचे लाभासाठी कमवता पुरुष (पती) मरण पावलेल्या दिनांकापासून एका वर्षात या सुविधचा लाभ घेणे अनिवार्य असल्याचे निकश आहेत़ त्यानुसार एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ मध्ये तालुक्यातील १४ विधवा महिला लाभार्थ्यांना विक्रमगडचे तहसिलदार सुरेश सोनवणे निवासी तहसिलदार आयुब तांबोळी, अरुण मुर्तडक, अन्य कर्मचारी वृंद यांच्या सहकार्यातुन प्रत्यकी २० हजार रुपयांचा धनादेष एका महिलेस देण्यांत आले आहेत़ तर २० अर्ज अजुन प्रलंबीत असून कार्यवाही सुरु आहे़ (वार्ताहर)
निराधारांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत
By admin | Published: January 22, 2016 2:02 AM