शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

सीआरझेड सुनावणी घेतलीच, दोन महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:58 IST

पालघर जिल्हा प्रारूप किनाराक्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील सुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास प्रशासन कमी पडल्याने ही सुनावणी स्थगित करून तिला २ महिन्याची मुदतवाढ देण्याची महत्वपूर्ण मागणी व आठ तास सुरू असलेला नागरिकांचा आक्रोश जिल्हाधिकाºयांनी दाबून टाकला.

पालघर : जिल्हा प्रारूप किनाराक्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील सुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास प्रशासन कमी पडल्याने ही सुनावणी स्थगित करून तिला २ महिन्याची मुदतवाढ देण्याची महत्वपूर्ण मागणी व आठ तास सुरू असलेला नागरिकांचा आक्रोश जिल्हाधिकाºयांनी दाबून टाकला. आणि जनसुनावणी उरकून १७४ हरकतींची नोंद घेतली.महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन विभागांतर्गत पालघर जिल्ह्याचा प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्रारुप आराखडा बनविण्याचे काम २०१७ मध्ये केरळ येथील नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स अँड स्टडीज या संस्थेने पूर्ण केले होते. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी तो पर्यावरण विभागाच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होता. त्यानुसार आलेल्या हरकतींवर ४५ दिवसाच्या आत सुनावणी घेणे बंधनकारक असल्याने सोमवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात तिचे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते. तिला जिल्हाधिकारी तासभर उशिराने उपस्थित झाल्याने ती सुनावणी १२ वाजण्याच्याच्या आसपास सुरू झाला.सुरुवातीलाच हा आराखडा इंग्रजीत असल्याने आदिवासी बहुल जिल्ह्यातील जनतेला तो समजला नाही म्हणून तो मराठीत प्रसिद्ध करावा, त्याची वेबसाइट ओपन होत नाही त्यामुळे जनतेला आक्षेप नोंदविता आले नसल्याने २ महीन्यांची मुदत वाढवून मिळावी, अशी जोरदार मागणी उपस्थित संघटना आणि स्थानिकांनी केली. त्यावर मला न्यायालयाचे निर्देश असल्याने व मुदत वाढवून देण्याचे अधिकार माझ्याकडे नसल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी त्याबाबत असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे भूमिपुत्र बचाव आंदोलन समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, पर्यावरण संवर्धन समिती, निर्भय जनमंच, जनआंदोलन समिती, सूर्या पाणी बचाव संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार संस्था आदी अनेक संघटनांनी ‘नही चलेगी,नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, रद्द करा, रद्द करा, जनसुनावणी रद्द करा अशा घोषणा देत सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. सुनावणी आम्हाला हवी आहे, परंतु शेतकरी, बागायतदार, आदिवासी, मच्छीमार वस्त्या उध्वस्त होणार असून किनारपट्टी धनदांडग्याच्या घशात घालण्याचे षडयंत्र रचले जात असेल तर ते यशस्वी होऊ देणार नाही असे बजावण्यात आले. जिल्हाधिकाºयांना वरिष्ठांशी सल्लामसलत करण्यासाठी अनेक वेळा सभागृह सोडावे लागत होते.या आराखड्यामुळे मच्छिमार, शेतकरी उध्वस्त होणार असल्याने येथे उपस्थित असलेली एकही व्यक्ती हा आराखडा आम्हाला हवा असे सांगत नसतांना ही सुनावणी आमच्यावर का लादली जात आहे. हाच का पारदर्शक कारभार? असा प्रश्न भाजपचे वरिष्ठ अशोक आंभिरे यांनी उपस्थित केला. किनारे धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र आखले जात असून ते कदापी यशस्वी होऊ दिले जाणार नाही असे मच्छिमार कृती समतिीच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती मेहेर ह्यांनी सांगितले.तर ह्यामध्ये अनेक उणीव आहेत,जनमानसांचा आदर ठेवून जिल्हाधिकार्यांनी निर्णय घ्यावा,मात्र आमचे म्हणणे नोंदविण्याची संधी आम्हाला मिळायला हवी असे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांनी सांगितले.कडेकोट बंदोबस्त सुनावणी रेटल्याचा आरोपही सुनावणी सुमारे आठ तास सुरू होती,ह्यावेळी अनेक संघटनांनी ह्या विरोधात आपली निवेदने जिल्हाधिकाºयांना सादर केली. यावेळी पालघर आणि सातपाटी सागरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परीसराला छावणी सदृष्य स्वरुप प्राप्त झाले होते.नकाशे उपलब्ध न करता सुनावणी घेणे, आराखडा जनते समोर न आणणे, वेबसाईट ओपन न होणे, अशा समस्या प्रकर्षाने असूनही प्रशासन व सरकार ही जनसुनावणी रेटून नेत असल्याचा सवाल जनआंदोलन समितीचे मिलिंद खानोलकर यांनी उपस्थित केला. त्याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नव्हते.हा आराखडा तयार करण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे तसेच जिल्हाधिकाºयांची जबाबदारी असूनही त्यांनी हा आराखडा पालघरवासियांना कळेल अशी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. हा आराखडा ज्यांच्यासाठी आहे, त्यांनाच तो कळणार नाही अशा भाषेत तयार करणे हा हुकूमशहीचाच भाग आहे . - समीर वर्तक,पर्यावरण संरक्षण समिती, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरार