शौकत शेखडहाणू : एप्रिलमध्ये सुरु झालेल्या आयपीएल क्रिकेटच्या सामन्यातील थरार तरुणाईला नाही तर वयोवृद्धांनासुद्धा उडा मारायला लावत आहे. क्रिकेटचे हे फिव्हर सध्या शहरी व ग्रामिण भागामध्ये सारखे असले तरी या काळात शहरातील नगरपरिषद, भाजी मंडईच्या मागे, केटी नगर, डहाणू गाव, कंक्राटी हे परिसर सट्टेबाजांची कें द्र ठरली आहेत. या धंद्याला महिना उलटला असून पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे फक्त बारीक लक्ष आहे, योग्य वेळी कारवाई करु एवढे बोलुन बाजू सावरत आहेत.कमी वेळामध्ये जास्त पैसे देणारा हा सट्टा शहरातील युवावर्गाला अकर्षित करीत असून अनेकदा कॉलेज विद्यार्थी या गर्दीमध्ये दिसून येत आहेत. अनेकांना त्यातील ज्ञान नसते त्यामुळे डहाणूतील अनेक इमारतींमध्ये बुकींनी गुप्तपणे आपले कार्यालये थाटली आहेत. हे बुकी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कारने फिरुन सट्ट्याची रक्कम गोळा करतात. या साठी पिंटो, काल्या, दर्जी हे बुकी नव्या खोल्या, गाळे, सदनिका, बंद कारखान्यांचा वापर करीत आहेत. या बाबत लोकमतने २५ एप्रिलचा अंकात वृत्त दिले आहे. क्रिकेट सट्ट्यामागे डहाणूतील युवा वर्ग ओढला जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. पोलीस कारवाई करीत नसल्याने गिल्लोगल्ली बुकी तयार झाले आहेत. तर बड्या बुकींचे मिरारोड कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. गत महिन्यात आयपीएल सामन्यांवर भार्इंदर पश्चिम व पूर्वेच्या दोन इमारतींमधील फ्लॅटमध्ये सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तीन सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून ५४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मग, पालघर पोलीस का कारवाई करीत नाही या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.प्रत्येक चेंडूवर हमखास आकर्षक रक्कम मिळत असल्याने या कडे कॉलेजचे विद्यार्थी, बेरोजगार तरु ण कारखानेदार, फुगेवाले, माजी नगरसेवक, राजकीय नेते मंडळी क्रिकेटच्या विळख्यात आहेत. दरम्यान, रात्री हरलेले पैसे बुकीला कुठुन द्यावे यासाठी विद्यार्थी, बेरोजगार तरुण उसनवारी करु न पैसे फेडत आहेत. त्यामुळे पालकांचा आणि तरु ण मुलांचा वाद चवट्यावर येत आहेत. विशेष म्हणजे पिंटो व काल्या असे दोन मुख्य बुकी असून त्याचे मिरारोड कनेक्शन आहे. ते दर रोज रात्री होणाऱ्या क्रिकेट सट्ट्यावर लॅपटॉपवर बेटिंग घेऊन मिरारोड येथे डाटा ट्रांनस्फर करतात. दररोज सकाळी आपल्या हस्तकामार्फत हा पैशाचा व्यवहार होत असतो. हरलेल्यांकडून सक्तीने पैसे वसूल करण्याचे काम सुद्धा तेच करीत आहेत. सट्टेबाजांसाठी ही नावे तोंडपाठ असतांना पोलीस कसे अनभिज्ञ आहेत हे आश्चर्य जनक आहे.
भार्इंदरपाठोपाठ सट्टा बुकींचे डहाणू कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:17 AM