शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

डहाणूतील शेतकऱ्यांचा संकरीत बियाणे खरेदीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:23 AM

मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे.

बोर्डी : मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे. दरम्यान संकरीत बियाण्यांच्या खरेदीतील फसवणुकीचा धोका टाळण्याकरिता योग्य मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे.कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ विभाग पडतात. त्यापैकी कोकण विभागामध्ये तीन विभाग येतात. कोकणाचे शेती व पीकपद्धती ठरविण्यामध्ये समुद्रकिनाºयापासूनचे अंतरसुद्धा महत्वाचे आहे. त्यानुसार किनाºयापासून १५ ते २० किमी खलाटी, २० ते ६० किमी वलाटी आणि त्यानंतर घाटमाथा असे हे तीन प्रकार आहेत. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून, तालुक्याचा समावेश प्रामुख्याने खलाटी आणि वलाटी क्षेत्रात होतो. तालुक्यात खरीप हंगामात १५००० हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यामध्ये हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० हेक्टर असे लागवड क्षेत्र आहे. डहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर फक्त कर्जत ७ या ११५ ते १२० दिवसाच्या कालावधीच्या भात बियाण्यांचे वाटप केले जाते आहे. या हंगामात २०० क्विंटल साठा कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. २० किलोच्या पोत्याची किंमत ८५९ रु पये आहे. मात्र सवलतीच्या दरात ४२५ रु पये आकारले जातात. या करिता लाभार्थी शेतकºयांकडे ७/१२ उतारा आवश्यक आहे. जास्तीतजास्त शेतकºयांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जमिनीच्या प्रकारानुसार भात वाणाच्या अन्य जातींचे पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र ते उपलब्ध नसल्याने किमती अधिक असूनही संकरीत बियाणांकडे शेतकरी वळला आहे.बिल जपा पिशवी उघडा टॅगच्या विरुद्ध दिशेने, उगवण कमी तर करा तक्रारभात बियाणे खरेदी केल्यानंतर तसेच पेरणीपूर्वी शेतकºयांनी योग्यती खबरदारी घेतल्यास सदोष बियाण्यांच्या फसवणुकीचा धोका टाळता येतो. त्यानुसार बियाण्यांची पिशवी टॅगच्या विरूद्ध दिशेने फोडावी, बियाण्यांचा नमुना पिशवीत राखून ठेवावा, बिलाची सत्यप्रत जपून ठेवावी, साधारणत: ५ ते ७ दिवसात बियाणे उगवते. मात्र उगवण क्षमता कमी आढळल्यास खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची तपासणी पंचायत समितीच्या सक्षम अधिकाºयास करण्यास सांगावे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी आढळल्यास बियाणे कायदा १९६६ कलम १९ नुसार कारवाई होऊ शकते. तालुकास्तरावर बियाणे तक्र ार समतिी गठीत केलेली असते. त्यासाठी शेतकºयांनी बियाणे खरेदी केल्यानंतर, पेरणीपूर्व तसेच पीक तयार झाल्यानंतर योग्य व अभ्यासपूर्ण निरीक्षण व नोंदी ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार