डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:32 AM2018-09-21T03:32:53+5:302018-09-21T03:33:11+5:30

सात दिवसाच्या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात आणि ढोल, ताशा, मृदुंग, बन्जो , लावणी, भांगडानृत्य, आणि आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत बागडत बाप्पाना मोठया भक्ती भावाने निरोप देण्यात आला.

 Dahanu immersion procession devotes Hindu Muslim unity | डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी

डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी

googlenewsNext

- शौकत शेख 
डहाणू: सात दिवसाच्या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात आणि ढोल, ताशा, मृदुंग, बन्जो , लावणी, भांगडानृत्य, आणि आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत बागडत बाप्पाना मोठया भक्ती भावाने निरोप देण्यात आला. डहाणूत सात दिवसाच्या ७१ सार्वजनिक, तर ८२ खाजगी गणपती बाप्पाचे विसर्जन डहाणूसमुद्र किनारा, पारनाक, आणि कंक्राराडी नदीत करण्यात आले. सर्वात मानाचा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या व सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या रामवाडी मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची अभूतपूर्व विसर्जन मिरवणुक नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ‘मै हूँ डॉन मैं हूँ डॉन’ च्या तालावर निनादत काढण्यात आली होती.
या मिरवणुकीत पुणे येथील ढोल, ताशे, गुजराथचा बँड, लावणी, भांगडानृत्य, आदिवासीनृत्य, वेस्टर्न डान्स, आणि त्याच्या बरोबरच हिंदू मुस्लीम सर्वधर्म समभाव दाखविणाऱ्या देखाव्यां ंबरोबरच चलत चित्र, तसेच डहाणूचा इतिहास दाखविणारा लेझर शो, दाखविण्यात येत होता.
या मिरवणुकीत आमदार पास्कल धनारे, आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार अमित घोडा, जि, प, अध्यक्ष विजय खरपडे, नगरसेवक जगदीश राजपूत, नगरसेवक, मुस्लिम नेते, आणि सर्व धर्माचे पंचवीस तीस गावांतील भक्त सहभागी झाले होते. यावेळी बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
>शिस्त पालनाने विसर्जन उत्साहात
ही मिरवणूक रामवाडी येथून संध्याकाळी सहा वाजता सुरू होऊन रात्री दहा वाजता बाप्पाचे विसर्जन डहाणू पारनाका येथील समद्रात करण्यात आले.
गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे व नियमांचे पालन केल्याने हे विसर्जन अत्यंत शांततेत व उत्साहात झाले.

Web Title:  Dahanu immersion procession devotes Hindu Muslim unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.