- शौकत शेख डहाणू : डहाणू नाशिक राज्यमार्गावर सारणी येथे सुर्या उजवा तीर कालव्याच्या मुख्य कालवा ( सारणी) साखळी क्र .११/३७५ पूर्णत: जीर्ण झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या पुलाचे निखळलेले स्लॅब आणि गंजलेल्या सळया बाहेर निघाल्याने पुल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.तालुक्यातील डहाणू नाशिक राज्यमार्गावरु न मुंबई अहमदाबाद हायवे गाठण्यासाठी डहाणू -चारोटी राज्यमार्ग तसेच वाणगाव-वधना राज्यमार्गाला सारणी पुलावरून वाहतूक केली जाते. डहाणू शहर, सरावली, आसवे, आशगड, गंजाड, रायतळी रानशेत तसेच वाणगाव निजकची सर्व वाहतूक सारणी पुलावरून केली जाते. म्हणजे तब्बल ६० हुन अधिक गावांचा भार या पुलावरून वाहला जात आहे.सुर्या उजवा तीर कालव्याहुन गावांना पाणी वाहून नेण्यासाठी सारणी येथे राज्यमार्ग ओलांडण्यासाठी पुल बांधण्यात आला आहे. परिणामी सारणी पुल दिमाखात खंबीरपणे उभे असल्याचे बाहेरून दिसत असले तरी या पुलाचा स्लॅब कोसललेला आहे. हा पुल कमकुवत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पाटबंधारे विभागाकडून आवश्यक ती डागडूजीची केली जात नसल्याचे या भागातील वाहन चालक, प्रवाशांचे म्हणणे आहे. या पुलावर कोणतेही संरक्षक कठडा अथवा पथदिव्याची व्यवस्था नाही त्यामुळे भरधाव दुचाकी थेट कालव्यात पडुन मागे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. हा पूल कोसळल्या अनेक गावांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होणार आहे. तर सदरचा पुल हा पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित येत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली जबाबदारी झटकली आहे. या राज्य मार्गावर रिलायन्स औष्णिक प्रकल्पाची राख वाहून नेणाऱ्या अतिभार वाहनांची या पुलावरून दिवसरात्र वाहतूक सुरु असते.>या वर्षीच्या नियोजनात डहाणू नाशिक राज्यमार्ग वरील अनेक लहान मोठे पुल घेतले आहेत. त्यामध्ये सारणी पुलाचा अंतर्भाव आहे. - खैरनार, उप अभियंतास.बा. डहाणू उपविभागया पुलाबाबत वारंवार पीडब्ल्यूडीला सूचना केल्या आहेत .येथे नवीन पूल बांधणे गरजेचे आहे . - अमित घोडा, आमदार
डहाणू-नाशिक मार्गावरील कालवा धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:06 AM