शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

डहाणूत राष्ट्रवादीचा वरचष्मा; तर शिवसेनेची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 12:12 AM

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला.

अनिरुद्ध पाटील/शौकत शेख ।डहाणू/बोर्डी : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला. शिवसेनेचा आलेख चढता तर भाजप आणि माकपला अपेक्षेप्रमाणे यश राखता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्हीही ठिकाणी खातेही उघडता न आल्याने ती भुईसपाट झाली. तालुक्यातील गटाच्या तेरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी $४, शिवसेना ३, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले. तर २६ गणांसाठी राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७ आणि माकपला २ जागेवर विजय मिळविता आला.जिल्हा परिषदेच्या डहाणू गटात यावेळी एका गटाची वाढ होऊन ही संख्या १३ झाली. मागील निवडणुकीत गटात १२ पैकी भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी २ तर काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला होता. चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला एकटे पाडून काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकपने आघाडी करून माकपच्या आमदाराला निवडून आणले. महाआघाडीची ही खेळी राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लढवित असल्याचा प्रत्यय या निवडणुकीत देत गटाच्या ४ आणि गणाच्या २६ पैकी सर्वाधिक ९ जागा निवडून आणल्या. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय असून माकपने सहकार्य न करता विरुद्ध मतदान केले, तर काही ठिकाणी उमेदवार उभे करून एक प्रकारे बिघाडी केल्याची प्रतिक्रिया या जिल्हा परिषद सदस्य आणि सायवन गटाचे विजयी उमेदवार काशिनाथ चौधरी यांनी दिली.विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपची पकड यावेळीही ओसरताना दिसली. गतवेळेला त्यांच्या गटाच्या ५ जागा होत्या. आता गटात एकाने आणि गणात तीन जागांची घट झाली. काँग्रेसला पूर्वीसारखेच गटाकरिता एकच उमेदवार निवडता आला तर गणासाठी आताही खाते उघडता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्ही प्रकारात एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. मागच्या निवडणुकीत गटातील २ आणि गणाच्या ४ जागा निवडून आणताना पंचायत समितीचे दुसऱ्या टर्मचे उपसभापती शैलेश करमोडा यांच्या रुपाने मिळवले होते. करमोडा यांनी जिल्हा परिषदेच्या ओसरविरा गटातून विजेतेपद मिळविले. माकपला अती आत्मविश्वास भोवताना दिसला. आमदारकी जिंकली असली तरी जिल्हा परिषदेची एकही जागा जिंकता आली नसून पंचायत समितीच्या मागच्या वेळेप्रमाणेच २ जागा राखता आल्या.दरम्यान, शिवसेनेचा चढता आलेख पहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची एकही जागा त्यांच्या नावावर नव्हती तर पंचायत समितीच्या २ जागा होत्या. यावेळी गटाच्या ३ आणि गणाच्या ८ जागा निवडून आणत दुसºया क्र मांकाचा पक्ष ठरला आहे. धामणगाव गटात सतीश सीताराम करबट हा एकमेव उमेदवार निवडून आला.