शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डहाणू न.पं. निवडणुकीत भरला रंग, बोलबच्चन मतदारांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:26 AM

डहाणू नगर परिषद निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार असून सर्वच वॉर्डात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. मात्र नगर परीषद अस्तित्वात येऊन तीस वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही जनतेला

शौकत शेख/अनिरु द्ध पाटीलडहाणू : डहाणू नगर परिषद निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार असून सर्वच वॉर्डात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. मात्र नगर परीषद अस्तित्वात येऊन तीस वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही जनतेला केवळ विकासकामांचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या वेळी योग्य उमेदवार निवडून देऊ असे मतदारांचे म्हणणे आहे.तीस वर्षाच्या काळात शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. या निवडणुकीत शिक्षित मतदारांची संख्या अनेक पटीने वाढली असून उच्च शिक्षितांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्या मध्ये स्वतंत्र विचार करणाºया शिक्षित महिलांचा टक्का ट्रम्पकार्ड सिद्ध होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक पूर्व अपेक्षित जागांचे भाकीत करणे जिकिरीचे बनले आहे. विविध वॉर्डामध्ये फिरून आश्वासनांची खैरात करणार्या पक्षांना सजग मतदारांकडूनच भविष्यातील नियोजित शहराच्या विकासाबद्दलचा रोडमॅप ऐकविला जातो आहे. तर दुसरीकडे पावणेतीन कोटी रुपये खर्चून आगर येथे बांधण्यात येत असलेले बालोद्यान तसेच थर्मल पॉवर नजिकचे करोडो रुपये खर्ची घालून बांधलेले मच्छीमार्केट हे शहरापेक्षा दूर असल्याने ही नियोजनशून्य कामे करणारे मतदारांच्या रडारावर आहेत. अनेक उच्चभू वस्त्यांमध्ये सुस्थितीत असणार्या डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच काँक्रिटच्या रस्त्याल ा मुद्दाम मुलामा देऊन डागडुजी करून विकासाच्या नावावर नाहक उधळपट्टी करणाºयांना या निवडणुकीत मतदार धडा शिकवतील.आपल्या पारड्यात अधिक मते मिळवून २५ पैकी जातीतजास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांना मतदारांची मते मिळविण्यासाठी प्रभावी फंडा वापरावा लागणार आहे. तर स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळणार नसल्याचा कयास असून अन्य पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा चालल्याने निवडणुकीला रंग भरला आहे.