बोर्डी : डहाणू रोड रेल्वेने स्थानकाबाहेरील पार्किंगची १ फेब्रुवारीपासून दरवाढ झाली आहे. नव्या टेंडरनुसार चर्चेगेट ते सुरत या पट्ट्यात दुचाकी-चारचाकी वाहनांना ही नियमावली लागू असल्याची माहिती डहाणू रोड स्थानकातील परफेक्ट फॅसिलिटी या पार्किंग एजन्सी तर्फे देण्यात आली. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये अन्यायाची भावना असून खदखद वाढली आहे.पूर्वीची एजन्सी १२ तासांकरिता २४ रु पये दुचाकीसाठी आकारत होती. तर नव्या एजन्सीने दोन तासाला १० रुपये, सहा तासाला २० रुपये, २४ तासपर्यंत ३० रु पये दर आकारणी केली जाते. त्यामुळे ६ रु पयांच्या वाढीने प्रवाशांमध्ये अस्वस्थता आहे. तर या स्थानकापासून पालघर १५ रुपये, विरार २० रुपये, बोरीवली २५ रु पये, दादर स्थानकापर्यंत ३० रुपये आणि चर्चगेट ३५ रु पये परेच्या तिकीटांचा दर आहे.दरम्यान चर्चगेट ते सूरत या पट्ट्यातील स्थानका बाहेरच्या पार्किंगची दर आकारणी नव्या नियमांनुसार एकच असल्याची माहिती एजन्सीच्या सूत्रांनी दिली.वाहतूककोंडीचे प्रमाण वाढलेडहाणू रोड रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिमेला सुमारे पाचशे दुचाकी पार्किंगची जागा उपलब्ध असून प्रतीदिन सरासरी साडेतीनशे ते चारशे वाहनं येतात. तर चारचाकीकरिता कमी जागा उपलब्ध असून वाहनांची संख्या कमी असते. पूर्वी दरकमी असल्याने पूर्ण पार्र्किंग फूल व्हायची. आता चित्र बदलले आहे. शहरातील रस्त्यालगत, दुकानांबाहेर आणि मोकळ्या जागेत उभ्या करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात वाहन चोरीही वाढेल अशी शक्यता वर्तिवण्यात येत आहे.नव्या टेंडरनुसार ही दर आकारणी असून त्यामध्ये जीएसटीचा अंतर्भाव आहे. चर्चगेट ते सूरत या पट्ट्यात पार्किंगचे दर समान आहेत. पुढील तीन वर्षाकरिता या एजंन्सीने टेंडर घेतले आहे.’’-भोलानाथ सिंग(परफेक्ट फॅसिलिटी एजंन्सी पार्र्किं ग, डहाणू रोड रेल्वे स्थानक)
डहाणू रेल्वेस्थानक पार्किंगची दरवाढ; कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:32 PM