- शौकत शेखडहाणू : येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील बहुसंख्य रस्ते खड्डेमय झाले असून ग्रामस्थांना व वाहनचालकांना त्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. त्यातच इराणीरोड, थर्मलपॉवर रोड, सागरनाका येथील रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये कंबरदुखी व अंगदुखीच्या व्याधी वाढल्या आहेत. जागोजागी पडलेले खड्डे व त्यात झालेला चिखल यामुळे अनेकदा भांडणाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे नगरपरिषद काय करतेय असा प्रश्न उपस्थित होत आहे.डहाणू रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाºया मुख्य प्रवेशव्दारवरच मोठ मोठाले खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबर, माती, बाहेर पडून तळी साचली आहेत. त्यामुळे वाहनचालक डहाणू नगरपरिषद हद्दीत दोन महिन्यापूर्वी सूजन निर्मल पाणीपूरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी संबंधित ठेकेदाराने सर्वत्र रस्त्याच्या कडेला खोदकाम केले होते. त्यासाठी डांबरा बरोबरच काँक्रीटचे रस्ते देखिल खादले होते. काम पुर्ण झाल्यावर खोदलेला भाग योग्य पद्धतीने न भरल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे.त्यातच आधीच्या रस्त्यांचा सुमार दर्जा व नंतरच्या खोदकामानंतर केलेली थातूरमातूर मलमपट्टी यामुळे पावसाच्या माºयापुढे सगळच पितळ उघडे पडले. पंधरा ते वीस दिवसांपासून पडणाºया पावसामुळे रस्त्यावरील खडी अस्ताव्यस्त झाल्याने दुचाकी वाहने घसण्याचे प्रकार होत आहेत. असंख्य ठिकाणीच्या रस्त्यावर मोठमोठे भगदाड तसेच खड्डे पडून रस्त्याची चाळणच झाली आहे. त्यामुळे एखादे वाहन रस्त्यावर भरवेगात जात असतांना येणाºया जाणाºया लोकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या अंगारव घाणेरडे पाणी उडून कपडे खराब होण्याच्या घटना वाढल्या आहेत.आमदारांनी दिली तंबी; प्रशासन म्हणते पावसानंतर दुरुस्तीडहाणूच्या विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत आमदार अमित घोडा यांनी चिंचणी, वानगांव, अशागड-धुंदलवाडी, कासा, सायवन, बोर्डी, घोलवड इत्यादी रस्त्यांची चाळण झाल्याचे अधिकाºयांना सांगितले.रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरलेले असतांना रात्रीच्या वेळी खड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत असल्याचे यावेळी घोडा यांनी निदर्शनास आणले. त्वरीत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले.यावेळी सा.बा.चे उपअभियंता टी.आर. खैरनार तसेच शाखा अभियंता संखे यांनी पावसाने उघडीप दिल्यावर ताबडतोब रस्ते दूरूस्त करण्यात येतील असे सांगितले.
डहाणूतील रस्त्यांवरील खड्डे बनले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:23 PM