अनिरुद्ध पाटील बोर्डी : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्र म संशोधन मंडळाकडून मराठी माध्यमातील १ ते ७ वी इयत्तेकरिता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्यातील सुमारे ५९ तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्र म राबवला जात असून पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील २६ केंद्रांतील शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.प्रातिनिधिक स्वरूपात बुधवारी पाच पालकांना या संचाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमीव्हावे यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्र म संशोधन मंडळाकडून मराठी माध्यमातील इयत्ता पहिली ते सातवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिली ते पाचवी या स्तरातील विषयांची संख्या कमी असल्याने त्या अभ्यासक्र माचे तीन भागांत विभाजन करण्यात आले आहे. तर सहावी आणि सातवीच्या अभ्यासक्रमाचे चार भाग आहेत. या उपक्रमानुसार प्रत्येक भागात त्या इयत्तांच्या सर्व विषयांचा समावेश एकाच पुस्तकात करण्यातआला आहे. एक भाग संपल्यानंतर दुसरा संच अध्ययन-अध्यापनासाठी वापरला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.>शैक्षणिक वर्तुळात स्वागतओझ्याविना शिक्षण या संकल्पनेतून शासनाने हा उपक्र म राबविला असून शैक्षणिक वर्तुळात त्याचे स्वागत केले आहे. दप्तराचे वजन कमी होऊन पाठदुखी, स्नायू दुखी, मणक्यांची झीज, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण आदी आजारापासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे.
डहाणूतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन होणार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:39 PM