डहाणू : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा धनधांडग्यासाठी सरकारने काढलेला राजमार्ग आहे. या साठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीनी सरकार लाटण्यासाठी दमदाटी करु पाहत आहे. या शेतीवर उदरनिर्वाह करीत असलेल्या जमीनी संपादन करु न शेतकर्यांना भुमीहीन, बेरोजगार बनवण्याचे सरकारचे कारस्थान आहे. परंतु मोदी सरकारला बुलेट ट्रेनसाठी एक इंचही जागा घेऊ देणार नाही असा निर्धार डॉ. अशोक ढवळे यांनी व्यक्त केला. डहाणू स्टेशनपासून पारनाका येथे निघालेल्या या निर्धार मोर्चाचे डहाणू समुद्रकिनाºयावरील सरु च्या बागेत सभेत रु पांतर झाले. यावेळी हजारो शेतकरी सहभागी होते.किसान सभेने एतिहासिक लाँग मार्चला घाबरु न सरकारने दिलेली आश्वसने पाळली गेली नाहीत. अद्यापही वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी पुर्ण झालेली नसुन य ा वनजमिनी सहा महिन्यात शेतकºयांच्या नावावर झाल्या नाही तर हे सरकार सहा महिन्यानंतर मंत्रालयात शिल्लक राहणार नाही. त्यांना खेचण्याचे काम आम्ही करु असा घणाघाती इशारा आॅल इंडीया किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ अशोक ढवळे यांनी दिला.बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाºया नरेंद्र मोदी सरकारला २०१९ च्या निवडणूकीत खाली पाडल्याशिवाय राहणार नाही असे ढवळे म्हणाले.यावेळी माजी आमदार नरसु आडम यांनी मोदी सरकारने जीएसटी आणी नोटबंदिमुळे हजारो लोकांना बेरोजगार केल्याची टिका केली.
डहाणूत किसान सभेचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:19 AM