डहाणू : तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत.घरांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र मदतीसाठी अद्याप शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याने आपत्तीग्रस्त कुटुंबांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे. पावन येथिल शाळेची पडझड झाली असून हजारो हेक्टर भातशेतीची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असुन शेतीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सात दिवसांपासून गावात अंधारवादळामुळे वीजेचे खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज वाहिन्या नादुरु स्त झाल्या आहेत. त्यामुळे धरमपुर, बापूगाव, बांधघर, निंबापूर, गांगोडी शेनसरी, सायवन, किन्हवली, दाभाडी दह्याळे वेहाळी रामपूर आदी दहा गावात शुक्र वारपासून तब्बल ७ दिवसापासुन वीज नसल्याने गावकºयांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.डहाणूत निर्माण झालेल्या आपत्तीमुळे झाडे उन्मळुन तसेच वीज खांब कोलमडल्याने वीज वाहीन्याचे कनेक्शन तुटले आहेत. वीजे अभावी पाण्याची सोय नसल्याने बापुगाव आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर ओढवली आहे.पाच दिवसापासुन वीज नसल्याने वीज कंपनीबाबात ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे.
वादळामुळे डहाणूतील ५२९ कुटुंबे उघड्यावर; आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाठवले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:00 AM