शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ओखी डहाणू, सुरत-खंबाताच्या आखातापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:47 AM

ओखी चक्र ीवादळाचा जोर मुंबई पासून हळूहळू डहाणू-सुरत ते खंबाताच्या आखातापर्यंत सरकत असून दुपारी डहाणूच्या

पालघर : ओखी चक्र ीवादळाचा जोर मुंबई पासून हळूहळू डहाणू-सुरत ते खंबाताच्या आखातापर्यंत सरकत असून दुपारी डहाणूच्या समोरील समुद्रात ३० नॉटिकल क्षेत्रात वा-याचा वेग ६४ किमी प्रति तास असला तरी जिल्ह्यातील किनारपट्टीभागात ह्या वादळा पूर्वीचे कुठलेही व्यवस्थापन दिसून येत नव्हते. मंगळवारी रात्री ९ नंतर हळू हळू मुसळधार पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने कळविल्याने प्रशासनाने सतर्कतेचे इशारा दिला आहे. जिल्ह्यात कुठेही प्राणहानीची घटना घडली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पालघरचे प्रांताधिकारी विकास गजरे, डहाणू च्या आचाल गोहेल, तहसीलदार महेश सागर आदी अधिकारी नायगाव ते झाई पर्यंतच्या किनारपट्टी वरील गावा गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास उपाय योजनांची तयारी करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवली होती.सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग ठाणे (पालघर) अंतर्गत डहाणू, पालघर, वसई तालुक्यातील नायगाव-खोचिवडे ते झाई अंतर्गत गावात सुमारे ६९१ नौका समुद्रात मासेमारीला गेल्या होत्या. ओखी वादळाच्या इशाº्या नंतर त्यापैकी रविवारी ३७७ नौका समुद्रातुन किनाºयावर परतल्या तर ३१४ नौका समुद्रात मासेमारी साठी थांबून राहिल्या होत्या. सोमवारी हे वादळ मुंबई सह कोकणातील किनारपट्टीवर धडकू शकते ह्या हवामान खात्याच्या इशाºया नंतर समुद्रात थांबलेल्या नौकाना तात्काळ त्यांच्या वायरलेस सेट वरून संपर्क साधून त्यांना माघारी बोलाविण्यात आले.वसई तालुक्यातील ४ नौकानी समुद्रात टाकलेली जाळी (डोली) घेण्यास उशीर झाल्याने त्या काल रात्री पर्यंत समुद्रात होत्या. त्या नौकानी मंगळवारी सकाळी किनारा गाठला तर ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरातील ६९० नौके पैकी सर्व नौका सुखरूप बंदरात परतल्याने जिल्ह्यातील एकही नौका समुद्रात राहिली नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सांगितले. मात्र, डहाणू (नरपड) भागात किनाºया लगत रचून ठेवण्यात आलेली जाळी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वाहून गेली तर बांबूच्या वलांदिवर वाळत टाकलेले शेकडो टन बोंबील, मासे कुजून खराब झाले. ओखी वादळाचा फटका किनारपट्टी सह इतर भागात बसणार असण्याच्या शक्यते मुळे सर्वत्र सतर्कतेचे आदेश यंत्रणेने दिला आहे.६ ते १० डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणजिल्ह्यात ६ ते १० डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून ४ ते ६ किमी प्रतितासाने वारे वाहणार असल्याचे जिल्हा कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी एस बी गंगावणे ह्यांनी लोकमतला सांगितले. डहाणू, पालघर भागातील चिकू ह्या फळासह भाजीपल्यावर बुरशीजन्य भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून आंबा, काजू वर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गाय, म्हैस, बकरी ह्या दुभत्या जनावरांना ठेवण्यात येणाºया गोठ्यात थंड वातावरण राहणार असल्याने त्यांच्यावरील परिणाम टाळण्यासाठी विद्युत प्रकाश ठेवून उष्णतेचे वातावरण शेतकºयांनी ठेवावे असे आवाहन गंगावणे ह्यांनी केले.मच्छीमारांच्या जाळ्या अन् समुग्रीचे नुकसान; नुकसानीचा आकडा वाढणार; कावळ्यांच्या थव्याने दिला संकेतडहाणू : ओखी वादळामुळे सोमवारच्या रात्रीपासून संततधार कायम होती. समुद्राच्या लाटांनी मच्छीमारांच्या जाळी आणि समुग्रीचे नुकसान केले. बहाड येथे चिंचेचे झाड पडून घराच्या छताची पत्रे फुटली. कुठेही जीवितहानी झाली नसली तरी सुकी मच्छीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कासा ११ मिमी, मल्याण ७.८ मिमी , चिंचणी ९.८ मिमी, डहाणू ८.२ मिमी आणि सायवन ६.४ मिमी या मंडळात पावसाची नोंद झाली. बहाडच्या कडूआळीतील गणू सुकºया कडू यांच्या घरावर चिंचेचे झाड पडल्याने छताची सिमेंट पत्रं फुटली, आगर किनाºयावर जाळांचे लाटांमुळे नुकसान झाले. तर धाकटी डहाणू येथे वारा आणि भरतीमुळे बांबू जमीनदोस्त झाल्याने वाळत घातलेली सुकीमासळी पाण्यात गेली. सोमवारी उशिरापर्यंत चिंचणी, डहाणू, नरपड, चिखले घोलवड आणि बोर्डी या गावांमध्ये सतर्कतेचा ईशारा देण्यासाठी दवंडी देणारी वाहनं फिरविण्यात आली. चिखले आणि आशागड या फिल्डरवर खराबी आल्याने दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता. खळ्यातील भात व पावळी, गवत यांचे मोठे नुकसान झाल्याने या शेतीपूरक व्यवसायावर उपजीविका करणाºयांवर संकट ओढवले आहे. पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांना विशेष काळजी घेण्याची तसेच शाळांना सुट्टी जाहीर केल्याचा संदेश प्रभावी ठरला. दरम्यान, या नैसिर्गक आपत्तीच्या वेळी सोशल मीडियाचा चांगला वापर झाला. मात्र, नेटकºयांनी शहानीशा न करता पाठवलेल्या संदेशांमुळे अफवांचे पीक येऊन नागरिकांना त्रास सोसावा लागला. मागील दोन दिवसांपासून दिवसरात्र कावळ्याचे थवे उंच झाडांच्या शेंड्यांवर बसून ओरडत असल्याने वादळ येण्याचे पारंपरिक संकेत खरे ठरत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरु असून त्याला स्थानिकांकडून दुजोरा मिळत आहे.विक्रमगडला अवकाळी पावसाचा तडाखाविक्रमगड : अगोदरच यंदा पाऊस लांबल्याने एैन भातकापणीच्या काळात अवकाळी पावसाने सर्र्वांचे मोठे नुकसान केल्याने हातातोंडाषी आलेला घास हिसकावल्यानंतर उरला सुरुला जो काही भात हाती लागला तो शेतकºयांनी आपल्या खळावर नेऊन ठेवले होते. मात्र, सोमवारी दिवसभवर ढगाळ, दमट व जवळ वातारणानंतर अचानक सायंकाळ पासून जोरदार पावसाने सुरुवात केली तर आज मंगळवारी देखील सकाळी अवकाळी पावसाने जोर धरल्याने जुलै महिन्यातील आवनीच्या पावसासारखा भास होत ैेहोता. शेतकरी बांधवानी खळयावर नेऊन ठेवलेला भात पुर्ण भिजल्याने तोही आता खराब झाला आहे. तालुक्यात मोठयाप्रमाणात घेण्यात येत असलेल्या भाजीपाला लागवडीचे तसेच तुर, हरभरा, चवळी यांची देची देखील धुळधान झाल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे आगोदर पासूनच कर्जबाजारी असणाºया शेतकºयावर अक्षरश: कोसळण्याची वेळ आणली आहे.दोन दिवसांपासून होत असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीपुरक व्यवसायावर जगणाºयावरही संकट आणले आहे. गवत-पाओलीचे यापूर्वीच मोठे नुकसान झाल्याने त्यांला कमी भाव मिळत आहे. आता तर खरेदी केलेले गवत देखील खराब झाल्याने व्यापाºयांचे देखील मोठे नुकसान झाले आहे़ या पावसाने गवत ‘पोओली भिजून काळी पडली असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे़ तर तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून विट भट्टी कारखाने सुरु झाले आहेत़ त्यात काही प्रमाणात कच्ची वीट तयार झाली आहे. ती देखील पाण्यात भिजल्याने व्यापारी वर्गासह मजुरांना देखील मोठा फटका बसलेला आहे़ दरम्यान निसर्गाच्या या लहरीपणाचा यावर्षी शेतकरी, व्यापार, सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असून मंदीचे सावट पसलेले आहे़ या अवकाळी पावसामुळे अगोदच बाजारपेठेत मंदी असतांना आता पुन्हा त्यात मोठी भर पडली आहे़वसई पूर्व भागात वीस तास बत्ती गुलपारोळ : ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामानात बदल झाल्याने वसईमध्ये ४ डिसेंबर रोजी पूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते . तर संध्याकाळी ७ च्या सुमारास पावसाचा शिडकावा सुरु झाला होता कोणत्याही प्रकारे वादळी वारे न वाहता याच वेळेस वसई पूर्व कणेर वीज विभागातील वीज गायब झाली होती. ती संपूर्ण रात्रभर व सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नव्हती. म्हणजेच जवळपास २० तास बत्ती गुल झाली होती. यामुळे येथील विजेवर चालणारे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. खराब हवामानाच्या पाशर््वभूमीवर शासनातर्फे सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्याने शाळेच्या तयारीची लगबग नसली तरी गृहिणी, कामगार, शेतकरी, दुकानदार, दवाखाने आदींची विजेवर चालणारी कामे खोळंबून होती.पालघर : पालघर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही ओखा चक्री वादळाचा थोडा फटका बसला असून कळंब, राजोडी, अर्नाळा, केळवे, बोर्डी, ह्या भागात पर्यटकांनी पाठ फिरविल्याने बिच वर चिटपाखरूही दिसून येत न्हवते. जिल्ह्यात सोमवार पासून सुरू झालेल्या पावसाने आज पहाटे ३ वाजल्या पासून जोर धरला आहे.ओखी चक्रीवादळाचा अर्नाळा किल्ला गावाला तडाखावसई : ओखी चक्रीवादळामुळे वादळी वाºयासह तुफान लाटा उसळल्याने अर्नाळा किल्ला गावातील पाच घरे कोसळली. ३० झाडे उन्मळून पडली असून बोंबील सुकवण्यासाठी असलेल्या पराती बोंबल्यासह वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. अर्नाळा गावालाही वादळाचा थोडा तडाखा बसला. तसेच काल रात्रीपासून मंगळवार संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरुच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. चक्रीवादळामुळे प्रचंड वादळी वारा सुटला होता. तर समुद्रात पाच मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांच्या तडाख्यांनी अर्नाळा किल्ला गावातील किनारलगतची लक्ष्मण मेहेर, अरुण मेहेर, गणेश किणी, अनुसया मेहेर, हसुमती म्हात्रे यांची पक्की घरे वाहून गेली. त्याचबरोबर राक्षसी लाटांनी किनाºयालगत असलेली नारळ, भेंडी आणि वडाची तब्बल तीस झाले उन्मळून पडली. तर किनाºयालगत असलेल्या चार बोटी समुद्रात बुडल्या आहेत. नरेश भोईर, नूतन मेहेर, सदानंद मेहेर, पांडुरंग मेहेर यांच्या पक्क्या घरांनाही धोका पोचण्याची भिती निर्माण झाल्याची माहिती पंचायत समितीच्या माजी सभापती चेतना मेहेर यांनी दिली. अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा गाव

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ