पारोळ : अंबाडी शिरसाड मार्गावर उसगाव नाक्यावर ३० तारखेला रात्री लोखंड भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सूटल्याने ते झाडाला धडक ल्याने या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या भीषण अपघातात वाहन चालक रामलाल मात्र नशिब बलवत्तर म्हणून किरकोळ जखमी झाला. या मार्गावर सतत होणाऱ्या अपघातामुळे या लोखंड वाहतुकीवर बंदी आणावी अशी मागणी या मार्गावरील नागरिक करीत आहेत. वाडा येथून रात्री च्या वेळी होणारी लोखंड वाहतुक अंबाडी शिरसाड मार्गावर होणारी लोखंड वाहतुक धोकेदायक ठरत असून वाहनांमध्ये भरलेले वजन, निकृष्ट दर्जा असलेली वाहाने, नशेबाज चालक, रात्री च्या वेळी वाहन हाकताना वाहनातुन बाहेर आलेले लोखंडी खांब, अमर्यादित वेग अश्या अनेक कारणामुळे या मार्गावर लोखंडाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. महामार्गावरील वस्त्यांनाही धोका नागरिकांनी विमा काढायचा का?सुदैवाने हे अपघात रात्री च्या सुमारास होत असल्याने दुर्घटना होत नसताना जर मार्गालगत असलेल्या मानवी वस्तीतिल घराला धडकले तर मोठी जिवित हानि होण्याचा धोका निर्माण झाला असून सायवन, घाटेघर, शिरवली, पारोळ, उसगाव, शिवणसई, चांदीप, मांडवी शिरसाड या गावांची वस्ती या मार्गालगत असल्याने रात्री होणाऱ्या या घातकी वाहतुकीमुळे विमा काढून राहायची वेळ या मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांवर आली आहे.
धोक्याची लोखंडी वाहतूक
By admin | Published: May 02, 2017 1:46 AM