वसई : विरार पूर्वेकडील गोपचरपाडा येथील एका घरात झालेल्या स्फोटात ५ वर्षीय मुलासह जखमी झालेल्या आई-विडलांचाही बुधवारी मृत्यू झाला.गोपचरपाडा येथील ओमब्राम्ह अपार्टमेंटमध्ये विजय वोरा हे आपली पत्नी भावना व मुलगा हिर्षलसह राहत होते. १९ सप्टेंबरला सकाळी विजय वोरा यांनी चहा बनवण्यासाठी गॅस पेटवताच स्फोट झाला आणि आगीचा लोळ उठला आणि तिघेही जबर जखमी झाले होते.सकाळची वेळ असल्याने घराची दार-खिडक्या बंद असल्याने तिघांनाही त्वरीत घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. शेजाºयांनी प्रसंगावधान दाखवून तिघांनाही बाहेर काढले व वसई-विरार शहर महापालिकेच्या रु ग्णालायत नेले होते. तिघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात नेले होते. पण त्याच दिवशी ५ वर्षीय हिर्षलचा मृत्यू झाला होता.त्यानंतर उपचार सुरू असताना विजय (३८) व भावना (३३) यांचा मृत्यू झाला. विरारचे मुख्य फायरमन विवेक किणी यांनी इंद्रायणी गॅस एजन्सीशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व जखमींच्या उपचाराचा खर्च तरी उचला अशी विनंती केली. त्यावर परिस्थिती बघून निर्णय घेऊ असे उत्तर एजन्सीतर्फे देण्यात आले. मात्र विजय यांची बहिण विणा पारेख यांनी गॅस एजन्सीशी संपर्क केला असता, तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा, असे उत्तर देण्यात आल्याचे सांगून आता कायदेशिर लढा देणार असल्याचे विणा यांनी सांगितले. या गॅस एजन्सीच्या भोंगळ कारभाराने आमचे अख्खे कुटूंब मृत्यू पावल्याचा आरोपही वीणा यांनी यावेळी केला.दुर्घटनेच्या चारच दिवसांपूर्वी मृत विजय यांची आई त्याच परिसरात राहणाºया दुसºया मुलाकडे रहायला गेली होती. त्यामुळे या अपघातातून ती बचावली.
सिलिंडर स्फोटातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:15 AM