वाडा : विक्रमगड तालुक्यातील अतिदुर्गम अशा सावरोली गावातील एका १९ वर्षीय महिलेची सातव्या महिन्यात प्रसूती झाली. त्यानंतर बाळ जागीच दगावले. या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. तनुजा पारधी (वय१९) असे त्या महिलेचे नाव आहे.विक्रमगड तालुक्यातील सावरोली या गावात तनुजा ही आपल्या कुटुंबासह राहत होती. तिला सातवा महिना सुरू होता. मंगळवारी प्रसूती वेदना सुरू झाल्याने रात्रीच्या सुमारास तिने एका मुलाला जन्म दिला, मात्र कमी महिन्याचे बाळ असल्याने काही वेळातच ते दगावले. मातेलाही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने या महिलेने कशीबशी रात्र जागून काढली, पण तिचीही तब्येत अधिकच खालावत गेली. बुधवारी सायंकाळी ४ वाजता तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. स्वप्निल राऊत यांनी तातडीने उपचारदेखील सुरू केले. वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुनील भडांगे यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल करण्याआधी तनुजाची प्रकृती गंभीर होती.
गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू, सातव्या महिन्यात प्रसूती; उपचारादरम्यान सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 1:05 PM