शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वसईकरांच्या नशिबी मरणही क्लेशदायी, लाकडे नाहीत, साठवण सुविधा नाहीत, दिवे नाहीत, गॅसदाहिनी रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:17 AM

वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही

शशी करपे वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही. वसईतील मृतदेहांच्या व त्यांच्या आप्तांच्या नशिबी येणा-या क्लेशदायी वस्तुस्थितीचा पर्दाफाश महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला आहे.वसई विरार महापालिका हद्दीत ८५ स्मशानभूमी असून त्यापैेकी ७७ वापरात आहेत. तर आठ पडून आहेत. पाणी, दिवाबत्ती, लाकडे आदी पायाभूत सुविधा बºयाच स्मशानभूमींमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब किरण चेंदवणकर यांनी स्मशानभूमींना प्रत्यक्ष भेट देऊन चव्हाट्यावर आणली आहे.महापालिकेने चालू आर्थिक वर्षात स्मशानभूमीच्या विकासासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात अगदी नगण्य खर्च करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांना परदेशात बसून थेट अंत्यसंस्कार पाहता यासाठी स्मशानभूमींमध्ये कॅमेरे लावण्याची घोषणा करणारी महापालिका बºयाच स्मशानभूमींमध्ये नळजोडणी, दिवाबत्ती, लाकडांसाठी गोदाम देऊ शकली नसल्याचा आरोप त्यांनी केला.महापालिका मोफत लाकडे देते. मात्र, ३३ स्मशानभूमींमध्ये लाकडे ठेवण्यासाठी गोदामे नाहीत. परिणामी दूरवर ठेवलेली लाकडे अंत्यसंस्कारासाठी येणाºया लोकांना वाहून न्यावी लागत आहेत. तर ४१ स्मशानभूमींमध्ये सध्या लाकडे उपलब्ध नाहीत. विरारमधील नारंगी स्मशानभूमीत नळ आहे पण पाणी नाही. चिता रचण्यासाठीचे स्टॅण्ड नाहीत. कार्यरत असलेल्या स्मशानभूमीत दोन ते चार स्टॅण्ड आहेत. पण, प्रत्येक स्मशानभूमीतील स्टॅण्ड तुटलेले आहेत. गास गावातील बंदरवाडी टाकीपाडा स्मशानभूमीत असे स्टॅण्ड नसल्याने दगडाच्या चौथºयावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.२७ स्मशानभूमींमध्ये दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात मोबाइलच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावा लागत आहे. प्रभाग समिती क मधील फणसपाडा आणि कोशिंबे स्मशानभूमीत दिवे आहेत, पण ते कायम बंदच असतात. ७७ स्मशानभूमींसाठी केवळ ५१ कायमस्वरुपी कर्मचारी आहेत. तुळींज स्मशानभूमीत नालासोपारा जनसेवा संस्थेचे चार कर्मचारी काम करीत आहेत. कर्मचारी नसल्याने उमराळे आणि उमराळे ब्राम्हण आळीतील स्मशानभूमीत ग्रामस्थ अंत्यविधी करतात. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत स्वतंत्र कर्मचारी नसल्याने महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांनाच काम करावे लागत आहे. बहुतेक स्मशानभूमींमध्ये राख काढण्याचे साहित्य नाही. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी महापालिकेने नालासोपारा समेळ पाडा आणि एव्हरशाईन आचोळे येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवलेली आहे. त्यासाठी लाखो रुपयांची तरतूदही केली आहे. पण, या दोन्ही गॅस दाहिन्या काम अपूर्ण असल्याने बंद आहेत. या गॅस दाहिनीत प्रत्येकी ४८ सिलेंडर्स आहेत. पण, वापर होत नसल्याने सिलेंडर्सना गंज चढलेला आहे. गरीबांनी गॅस दाहिनीचा वापर केल्यास त्यांना एक हजार रुपये घरपोच देण्याची महापालिकेने घोषणा केली पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. महापालिकेचे स्वत:चे एकही शवविच्छेदन केंद्र आणि शवागर नाही. केवळ एकच शववाहिनी आहे. करदात्यांचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.>दफनभूमी, कब्रस्तानच्या वाट्यालाही उपेक्षाचमाणिकपूर शहरात सनसिटी येथे मुस्लीम बांधवांसह इतर धर्मींयासाठी दफनभूमीसाठी जागा आरक्षित केली आहे. त्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा खर्चही करण्यात आलेला आहे. मात्र, याठिकाणची कामे अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाहीत. प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मींयांसाठीची दफनभूमी अद्याप कागदावरच आहे.