शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

रिक्षा-ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

By admin | Published: March 11, 2017 2:11 AM

तलासरी-उंबरगाव राज्यमार्गावर गॅस गोडाऊन जवळ ट्रकने दिलेल्या धडकेने रिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात रिक्षामधील विद्यार्थिनी लक्ष्मी धोडी हिचा जागीच मृत्यू झाला

तलासरी : तलासरी-उंबरगाव राज्यमार्गावर गॅस गोडाऊन जवळ ट्रकने दिलेल्या धडकेने रिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात रिक्षामधील विद्यार्थिनी लक्ष्मी धोडी हिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुलीचा मृतदेह तलासरी ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून पळून जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडले आहे.सकाळी सव्वाआठच्या सुमारास कवाडा येथून तालुक्यातील गोदावरी परु ळेकर कॉलेजला रिक्षाने जात असताना तलासरी-उंबरगाव रोडवर उंबरगाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. रिक्षातील चालक सुरेश मेरे हा जखमी झाले असून माजे बसलेली महाविद्यालयीन विद्यार्थिनी लक्ष्मी रमेश धोडी (१९) हिच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रु ग्णालयात हलविण्यात आले होते परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या अपघाताची नोंद तलासरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.तलासरी परिसरात एसटी महामंडळाच्या बस अजूनही अनेक रस्त्यावर धावत नसल्याने विद्यार्थी शाळा कॉलेज गाठण्यासाठी मिळेल त्या वाहने जीव धोक्यात घालून प्रवास करीत असतात. त्यामुळे हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)