वाडा : वाडा शहराला आता गेल्या काही वर्षांपासून फटाक्यांचे शहर अशी नवी ओळख मिळाली असून येथे फटाक्यांची मोठी उलाढाल होत असून दिवसेंदिवस ती वाढतच आहे. मात्र यावर्षी मंदीचे सावट असतानाच विधानसभा निवडणूक आली. त्यानंतर परतीचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत असल्याने फटाक्याचा व्यवसाय यावर्षी ३५ ते ४० टक्यांनी कमी झाला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, मुंबई येथे फटाक्यांचे घाऊक आणि किरकोळ विक्रते असूनही येथील फटाके व्यापाºयांकडील वाजवी दरामुळे विक्रेत्यांचा ओढा वाडा शहराकडेच असतो. त्यामुळे घाऊक व्यापाºयांची एकच गर्दी व्हायची. मात्र यावर्षी मंदीचे सावट त्यात निवडणुका व आता पाऊस यामुळे आमच्या व्यवसायात कमालीची घट झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
वाडा शहरात प्रितम सेल्स एजन्सी, दिलीप ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, सिद्धिविनायक ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स आदी घाऊक फटाक्यांची दुकाने असून दिवाळीच्या वेळेस ही दुकाने रात्रंदिवस सुरू असतात. तमिळनाडू येथील शिवाकाशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. तेथून थेट फटाके येथील व्यापारी आणतात.
सध्या फॅन्सी फटाक्यांची धूम असून त्याचीच मागणी जास्त आहे. फॅन्सी फटाके ५० रूपयांपासून २००० च्या वर आहे. यामध्ये शोभेचे फटाके, पाऊस, चक्री, फुलबाज्या, रॉकेट, फॅन्सी शॉट,फॅन्सी मल्टीकलर शॉट,आकाशात उडणारे फॅन्सी शॉट, डबल बार, ट्रिपल बार, कार्टून, नागगोळी , चिटपुट, किटकॅट, अॅमबॉम्ब ,लवंगी, आकाशातील रंगीबेरंगी फटाके, सुतळी बॉम्ब,जमीनचक्र , फटाकडी आदी विक्रीसाठी आहेत.स्वीपकार्डची व्यवस्था
फटाके व्यवसाय हा रोखीने करण्याऐवजी आॅनलाईन करावा यासाठी व्यापाºयांनी स्वीपकार्डची व्यवस्था केली आहे. त्यामुळे स्वीपकार्डद्वारे ग्राहक व्यवहार करू शकतात.
सुरक्षिततेसाठी नियंत्रण यंत्र
कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक दुकानात फायर नियंत्रण यंत्र बसवण्यात आले आहे. तसेच दुकानासभोवताली पाण्याची पाइपलाइन फिरवण्यात आली आहे. तसेच दुकानासमोर गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था केली आहे.
फटाक्यांचे दरपाऊस, चक्रि : २३ रूपयांपासून ९० रूपयांपर्यतफुलबाजे : ३५ पासून ९० रूपयांपर्यतरॉकेट : ५० पासून १२० रूपयांपर्यतफॅन्सी शॉट : ३८० पासून २००० हजारा पर्यंतमल्टी कलर शॉट : ३५ पासून १५० पर्यंतबटर फ्लाय : २०० ते २५०नागगोळी : १० ते १५ रूपयेआपटी बॉम्ब : १० ते १५ रूपयेडबल शॉट : ४० ते ५०, बंदूक : ५० ते २००