शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

मीरा भाईंदरमधील 'डीप क्लीन ड्राईव्ह'चा शुभारंभ' शनिवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 

By धीरज परब | Published: December 27, 2023 7:32 PM

३० तारखेला सकाळी ९ वाजता नवघर नाका हनुमान मंदिर येथून या स्वछता मोहिमेची सुरुवात होईल.

मीरारोड - 'मुख्यमंत्री स्वछता अभियान' अंतर्गत 'डीप क्लीन ड्राईव्ह' म्हणजेच संपूर्ण स्वछतेच्या मोहिमेचा मीरा भाईंदर मधील शुभारंभ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता करणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात बुधवारी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक यांनी ह्या मोहिमे बाबत माहिती दिली . त्या आधी त्यांची या स्वछता मोहिमेच्या आयोजना बाबत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनानुसार व्‍यापक स्‍तरावर संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे. मुंबईत नंतर हि संपूर्ण स्‍वच्‍छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्यास सुरुवात करणारे मीरा भाईंदर हे दुसरे शहर ठरणार आहे. स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित शहर राहावे यासाठी अनेक उपक्रम , मोहिमा हाती घेतल्या जातील.  लोक सहभाग वाढावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री मीरा भाईंदरच्या रस्त्यावर उतरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ . सरनाईक यांनी केले आहे. 

३० तारखेला सकाळी ९ वाजता नवघर नाका हनुमान मंदिर येथून या स्वछता मोहिमेची सुरुवात होईल. हनुमान मंदिर परिसर, येथील मार्केट व तलाव परिसरात स्वछता मोहीम सुरु होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मुख्य रस्त्यावर स्वछता मोहिम राबवली जाणार असून त्यात स्वतः मुख्यमंत्री सहभागी होतील. याच परिसरात आ. सरनाईक यांच्या संकल्पनेतून महापालिकेची पहिली सीबीएसई  शाळा सुरु होणार असून त्या शाळा इमारतीला मुख्यमंत्री भेट देतील. तसेच हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे कला दालन निर्मितीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असून त्या कामाची मुख्यमंत्री पाहणी करतील. आ. सरनाईक यांच्या विशेष निधीतून मीरा भाईंदर क्षेत्रात कचरा संकलन करण्यासाठी १० घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या गाड्यांचे लोकार्पणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 

याआधी मीरा भाईंदर शहराला स्वछतेसाठी राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. आता संपूर्ण स्वछता म्हणजेच डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम आणखी व्यापक व प्रभावीपणे राबवली जाणार असून त्यात नागरिकांनी निरंतर सहभाग घ्यावा. लोक सहभाग वाढविण्यासाठी लोकांचे प्रबोधन व विविध उपक्रम केले जातील. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी संपूर्ण आराखडा बनवला गेल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

आयुक्त काटकर म्हणाले की , डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत ६८ प्रकारची विविध कामे आम्ही करणार आहोत. शहरातील नागरिकांचे राहणीमान सुधारावे , शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी प्रयत्न केले जातील. स्वछता मोहीम पुढील ३ महिन्यात आणखी प्रभावीपणे राबवून यशस्वी केली जाईल. स्वछता ही निरंतर व नियमीत चालणारी प्रकिया आहे. नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वछ्तेबाबत जाणीव व जागरूकता निर्माण करून , प्रबोधन करण्यासही पालिका तितकेच प्राधान्य देईल. शहरात ८८ उद्याने अधिक चांगली केली जातील. पुढील ३ महिन्यात १०० टक्के कचरा वर्गीकरण प्रत्यक्षात व्हायला हवे असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पालिका बायोगॅस प्लांट तयार करत आहे. रस्त्यावर धुळीचा त्रास होतोय तो कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  

टॅग्स :mira roadमीरा रोडEknath Shindeएकनाथ शिंदे