जव्हार : गणश चतुर्थीला वाजत गाजत आलेल्या दीड दिवसांच्या गणरायांचे शुक्रवारी भक्तांनी येथील सूर्या तलावात मोठ्या भक्ती भावाने विसर्जन केले. नगर परिषदेकडून विर्सजनाची संपुर्ण तयारी करण्यात आलेली आहे.प्रशासनाच्यावतिने भक्तांना येथे सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या होत्या. निर्माल्य कलश, जीवन रक्षा पथक तसेच सुरक्षा व्यवस्था तैनात होती. तसेच तलावात विर्सजनाकरीता होडीची व्यवस्था करून सहा कर्मचारी ठेवण्यात आले होते. पुढील दहा दिवसांपर्यत येथे होणाऱ्या विसर्जनाच्या वेळी लाईफ जॅकेटसह पाच कर्मचारी ठेवण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे कर्मचारी उत्तम शेवाळे यांनी दिली. बाप्पाला निरोप देताना अनेक भक्तांच्या कडा पाणावल्या होत्या.बोईसर-तारापूर परिसरात दीड दिवसाच्या ३०० बाप्पांचे विसर्जनबोईसर : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात लाडक्या गणरायाचे आगमन गुरु वारी झाले. अन् दुसºयाच दिवशी दीड दिवसांचा पाहुंचार घेऊन निघालेल्या गणपतीला निरोप देताना भक्तांचा कंठ भरुन आला होता, बोईसर तारापूर परिसरातील दीड दिवसाच्या ३०० गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळी गणेश भक्तांनी गर्दी केल्याने उशिरापर्यंत बाप्पांच्या मिरवणूका सुरू होत्या. घरघुती गणरायाबरोबरच काही सार्वजनिक मंडळातील बाप्पांना यावेळी निरोप देण्यात आला. विसर्जन मार्गावर व स्थळांवर ठीक ठिकाणीपोलीस तैनात करण्यात आले होते. तारापूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बाणगंगा नदी व तारापूर समुद्र किनारी विसर्जन झाले.बोईसर पोलीस ठाणे क्षेत्रात २७५ खासगी तर ५ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन बेटेगाव नदी (कुंड), वंजारवाडा कुंड ,सरावली खाडी ,कुंभवली तलाव इत्यादी ठिकाणी तर याच क्षेत्रातील काही गणपती चिंचणी व आलेवाडी आणि नांदगाव समुद्र किनारी विसर्जन करण्यासाठी नेण्यात येत होते. या वेळी ठीकठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी होत होती. यावेळी भक्तांची मोठी गर्दी होती.८०० खाजगी तर १२५ सार्वजनिक बाप्पांचे विसर्जनडहाणू : तालुक्यामध्ये डहाणू , कासा, घोलवड, वाणगाव परिसरातील तब्बल ८०० खाजगी गणपतीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी डहाणू समुद्र, आगर, डहाणू खाडी,वाढवण, वरोर, बोर्डी, चिखला, नरपड समुद्र ,सुर्या नदी येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नगर परिषदेत ४५० खाजगी तर ५२ सार्वजनिक गणपतींना निरोप दिला. घोलवड येथे शंभर खाजगी तर १४ सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आला. कासा येथे ८० खाजगी तर १० सार्वजनिक वाणगाव येथे १७० खाजगी ४९ सार्वजनिक गणपतींना निरोप दिला. यावेळी सामाजिक संघटनांनी मोठी मदत केली.वसई तालुक्यात वाजतगाजत बाप्पांना निरोपपारोळ/नालासोपारा : गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या जयघोषांसह वसई तालुक्यात ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. गुरूवारी मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरु वात झाली.सायंकाळपासून सुरु झालेले विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. उमेळमान, चांदीप, शिरगाव, जुचंद्र, वालीव, धानिवबाग, पापडी, दिवाणमान, नायगाव,विरार पुर्व मनवेलपाडा, बोळींज, आगाशी, नाळा तलाव, सोपारा चक्र ेश्वर तलाव, आचोळा, गोखीवरे, दिवाणमान, वसई, निर्मळ आदी ठिकाणी विसर्जन झाले.
दीड दिवसाच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:42 AM