शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

ग्रामीण भागातही रेडिमेड पुरणपोळ्यांना मागणी; महागाईची झळ, प्रति नग २०-२५ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:49 PM

पूर्वीच्या काळी होळीच्या सणाला ग्रामीण भागात घरोघरी पुरणपोळ्या बनवल्या जात असतं. मात्र आता नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

राहुल वाडेकर विक्रमगड : पुरणपोळ्यांशिवाय होळीच्या सणाला मजा नाही. अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपलेल्या शिमगोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असले तरी घरगुती व विविध खाद्यपदार्थांच्या दुकानात रेडिमेड पुरणपोळीचे फलक झळकू लागले असून त्यांना मागणीही आहे.  ग्रामीण भागातील महिलाही आता रोजगारासाठी घराबाहेर पडू लागल्याने या रेडिमेड पुरणपोळ्या घेण्याकडे त्यांचा कल दिसतो. या पोळ्यांनाही महागाईची झळ बसलेली असून गेल्या वर्षी १० ते १५ रुपयांना मिळणाऱ्या पोळीसाठी यंदा २० ते २५ रुपये मोजावे लागणार आहेत.  

पूर्वीच्या काळी होळीच्या सणाला ग्रामीण भागात घरोघरी पुरणपोळ्या बनवल्या जात असतं. मात्र आता नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी रेडिमेड पदार्थ, पोळ्या विकत घेऊन त्यात आनंद शोधला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातही रेडिमेडच्या पोळ्यांना हल्ली मागणी वाढली आहे. दुकानांत व बचत गटांच्या माध्यमातून पुरणपोळ्या सहज मिळू लागल्याने होळीसाठी पोळ्यांची मागणी वाढली आहे. आगाऊ मागणीनुसार त्या जास्त प्रमाणातही उपलब्ध करून दिल्या जातात. वाढत्या महागाईमुळे दर वाढलेले आहेत. तर काही विक्रेत्यांनी शक्कल लढवत या पोळ्यांचे दर न वाढवता त्याचा आकार व वजन कमी केलेले आहे. 

छोटे विक्रेते, बचतगटाचे स्टॉल याचबरोबर मिठाईच्या दुकानातूनही या पोळ्या सहज मिळतात. यंदा कोरोना, लॉकडाऊनमुळे बिघडलेले आर्थिक गणित यामुळे प्रत्येक सामान्य माणूस आधीच मेटाकुटीला आला आहे. तरीही दरवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला व्यवसाय होईल, अशी विक्रेत्यांना आशा आहे.

पुरणपोळ्या तयार करणाऱ्या महिला या आधी दिवसाला १५० ते २०० रुपये रोज घेत होत्या. मात्र आता गॅसच्या किंमती व वस्तूंचेही भाव वाढले आहे. त्यामुळे पोळ्यांच्या किमतीत दरवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नाही. अन्यथा पुरणपोळ्या बनविण्याकरीता केलेला खर्च व त्यातून मिळणारा नफा यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. एक नग २० रुपये प्रमाणे ऑर्डर व विक्री केली जात आहे.   - जयश्री औसरकर ,अध्यक्ष, सद्गगुरुबचत गट विक्रमगड

वारंवार होणारी वस्तूंची भाववाढ, इंधनदरवाढ, मजुरीची दरवाढ, डाळ, गुळाची दरवाढ यामुळे पुरणपोळ्याही महागल्या आहेत. पुरणपोळी बनविण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे गूळ ६५ ते ७० रुपये किलो तर चण्याची डाळ ६० ते ६५ रुपये किलो आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढ झाल्याने  या पदार्थाच्या किमतीतही वाढ झाली आहे.    - वंदना वाडेकर, गृहिणी, विक्रमगड