लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : लॉकडाउनमध्ये सर्वच स्तरावरील अर्थकारण बिघडले आहे. मात्र, या कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांकडे शालेय शुल्काची मागणी होत असल्याच्या तक्र ारी पालकांनी केल्या होत्या. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पालघरच्या सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाची भेट घेऊ न चर्चा केली. शाळा व्यवस्थापनाने कुठल्याही विद्यार्थ्याबाबत अन्यायकारक भूमिका घेतली नसल्याचा खुलासा केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण संस्थांनी येत्या शैक्षणकि वर्षात शुल्कवाढ करू नये, तसेच शुल्क टप्प्या-टप्प्याने भरण्याचा पर्याय शाळांनी द्यावा, असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय मनुष्यबळ विभागाने दिलेले आहेत. मात्र, सेंट जॉन स्कूल विद्यार्थ्यांकडे शालेय शुल्काच्या मागणीचा तगादा लावत असल्याच्या तक्रारी पालकांनी मनसेकडे केल्या होत्या. त्याबाबत उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि भावेश चुरी, सचिव दिनेश गवई, तालुकाध्यक्ष मंगेश घरत, शहर अध्यक्ष सुनील राऊत, मनविसेचे धीरज गावड, शहर सचिव शैलेश हरमळकर आदींच्या शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊ न चर्चा केली.लॉकडाऊन सुरू असेपर्यंत शालेय शिक्षण शुल्काची मागणी करू नये, अशी मागणी असल्याचे सांगताच अशी सक्ती आम्ही कोणावर करत नसून कुणाला आर्थिक अडचण असल्यास त्यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्याचीही मुभा देण्यात येईल, असे व्यवस्थापनाने सांगितल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष सुनील राऊत यांनी दिली.