जव्हार : सिल्व्हासा रस्त्यावरील दाभोसा धबधबा अवघ्या १७ कि.मी. अंतरावर असल्यामुळे पावसाळ्यात येथे मुंबई, नाशीक, ठाणे, वसई, पालघर येथून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, ब्रिटीश काळापासून एकच रस्ता असलेल्या या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे तसेच, वर्षानुवर्ष या रस्त्याची डागडुजी किंवा नूतनीकरण न झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. मात्र, येथे बांधकाम विभागाकडून कुठलीच दुरूस्ती अथवा साईडपट्टीची कामे केली जात नाहीत, त्यामुळे सार्वजनिक बांधकामा विभागाची उदासिनता दिसत आहे.शहरापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर जांभूळविहिर समोरील मार्गवर मोठ्याप्रमाणात वसाहत झाल्यामुळे आणि खेडोपाड्यातून व कंपनीच्या मलवाहू गाड्यांच्या ये-जा सुरू असते, परंतु खड्ड्याखड्ड्यांच्या वा अरूंद रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांना अपघात होतात. त्यामुळे जांभूळविहिरकरांनी आणि या भागातील वाहन चालकांनी यारस्त्याचे रूंदीकरण करून मजबूत करावे अशी मागणी केलेली आहे. अरुंद असला तरी, जव्हार-सिल्व्हासा या रस्त्यावरून गुजरात- दादरा नगर हवेली कडून नाशिक कडे जाण्यासाठी अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते, त्यात जांभूळविहिर परिसरांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्यामुळे तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच मोटारसायकल वाहनचालकांना जीवमुठीत धरून जावे-यावे लागते.आम्ही ऐवढ्या लांबून प्रवास करीत येथे येतो, मात्र जव्हारहून दाभोसाला जाताना आम्हाला गाडीत एवढे धक्के बसतात की. पाठीच्या मणक्याची डीस्क ढासळते की, स्पॉन्डेलाईटीस जडतो अशी धास्ती वाटते. त्यातच गाडींचेही मोठे नुकसान होते, त्यामुळे परत येण्याचा विचार आम्ही करत नाहीत. - डॉ. नितीन गोखलेपर्यटक, मुंबई
सिल्व्हासा रस्ता रुंदीकरणाची मागणी
By admin | Published: August 08, 2015 9:45 PM