वाडा : तालुक्यातील गुंज येथील शेकडो वर्षे जुन्या परशुराम मंदिसाच्या चिरा ढळू लागल्या असून मंदिराच्या भिंतीनाही धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षित धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्ता झाल्याचा आरोप अखिल भारतीय परशुराम सेनकडून करण्यात आला आहे.हे मंदिर एका टेकडीवर असून लांबूनच त्याचे दर्शन होते. परशुरामाला भार्गव नावाने सुद्धा ओळखले जात असल्याने गावाच्या टोकाला असलेल्या तलावाजवळून जाणारी पायवाट आपल्याला भार्गवरामाच्या मंदिरात घेऊन जाते. ही वास्तू उत्तराभिमुखी असून संपूर्ण जांभ्या दगडात बांधलेले आहे. मंदिराचे गर्भगृह आणि गाभारा असे दोन भागात विभागले आहे. गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी तीन दिशांना दरवाजे आहेत. मंदिराचा गाभारा छोटा असून भार्गवरामाची मुर्ती चौथाºयावर दगडी महिरप उभी आहे. मर्ती साधारणपणे दोन फूट उंचीची आहे. मूर्तीच्या गळ्यात फुलांचा हार कोरलेला असून भार्गवरामाने पिवळे पितांबर नेसलेले आहे.सातशे वर्षे जुनेपरशुरामाच हे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने असून त्याची आता परझड होत चालली आहे. मंदिराचे एक एक दगड निखळत चालले आहेत. मंदिरावर झाडे झुडपे वाढल्याने त्याचा पासून मंदिराला धोका उत्पन्न झाला आहे.
परशुरामाच्या मंदिराची पडझड, पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 5:55 AM