- राहुल वाडेकरविक्रमगड : आधारकार्ड देण्यासाठी तालुक्यांत केंद्रे सुरु करण्यांत आली़ त्यानुसार आतापर्यत विक्रमगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत व चांगल्याप्रकारे ही केंदे्र सुरु होती त्यानुसार आतापर्यत विक्रमगड तालुक्यातील ७० हजार नागरिकांना ती मिळालीत. परंतु अदयाप अनेक आधारकार्डा पासून वंचित आहेत व आता शासनाने सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य केल्याने आता सगळेच झोपेतून जागी झाले आहेत. मात्र काही काळापासून येथील आधारकार्ड केंद्र बंद करण्यात आल्याने ते पुन्हा सुरू करण्याची मागणी होते आहे़प्रत्येक नागरिकाला आपली स्वत:ची सपूर्ण ओळख सांगणारा आधार हा बारा आकडी क्रमांक (यु़ आय़ डी़) मिळत असून तालुक्यात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रानुसार हा कार्यक्रम राबविला गेला आहे सुरुवातीला लोकांना यांची माहिती महत्व माहिती नसल्याने ज्यावेळेस ही केंद्र गावोगाव चालू झाली तेंव्हा त्याकडे दुलक्ष केले होते,परंतु जसे जसे या कार्डचे महत्व उमगू लागले तसे तसे लोक रोज दिवस केंद्रावर गर्दी करु लागले, मात्र त्यावेळेस ही केंद्र बंद झाली आणि तालुका पातळीवर फक्त सुरु राहीली आतापर्यत तालुक्यातील नव्हे तालुक्या बाहेरील लोक देखील विक्रमगडच्या आधारकेंद्रात कार्ड काढण्याकरीता येत आहेत मात्र सद्यस्थितीत हे तालुक्यात चालूु असलेले एकमेव केंद्र बंद झाले असल्याने येथील जनता आधारकार्डापासून वंचित आहे़हा आधार नंबर देण्यामागे शासनाचा उद्देश फार मोठा असून या माध्यमातून शासकीय सेवा सुविधांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचावा, हा आहे. ़ स्थावर मालमत्ता,खरेदी-विक्री करतांनाही या नंबरचा उपयोग होणार आहे़ या योजनेचे अंतर्गत पहिला , दुसरा व तिसरा टप्पा घेण्यांत आला परंतु त्यामध्ये अनेकांना याची योग्य माहिती नसल्याने त्यांनी या दोन टप्प्यात खास करुन ग्रामीण भागांमध्ये अल्प प्रतिसाद दिला व अनेकजण या आधारकार्डापासून वंचित राहीलेले आहेत़ त्यामुळे शासनाने वंचित राहीलेल्या लोकांसाठी केंद्र पुन्हा सुरु केले होते़ व आता लोकांना आधार कार्डचे महत्व समजलेले आहे़ व त्यासाठी लोक गर्दी करु लागलेले आहे़त्यानुसार प्रत्येक नागरिकांला हा क्रमांक दिला जाणार आहे़ हा क्रमांक घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, ग्रामपंचायत ओळखपत्र (दाखला) आदी प्रकारातील एखादे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे़ या नंबरकरीता माहिती घेतांना नागरिकांचा फोटो, त्यांच्या बुबुळांच्या प्रतिमा, व दोन्ही हातांच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत़ यामुळे हा नंबर असलेला नागरिक देशातील कोणत्याही राज्यात गेल्यास त्याची ओळख सिध्द करता येईल. एकाच व्यक्तींना दोन राज्यांत आधार क्रमांक घेता येणार नाही़ ज्यांनी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये आधार कार्ड घेतले आहे त्यांना पुन्हा आधार कार्डसाठी जाण्याची गरज नाही़ व ज्यांचेकडे आधार नोंदणी पावती असेल त्यांनी ते केंद्रावर दाखवून ती सलग्न करुन घेता येणार आहे़ असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर बंद पडलेली आधारकार्ड केंद्रे तातडीने पुन्हा सुरू करण्याची गरज जाणवते आहे.शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे पगार,बँकेमध्ये खाते उघडणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृृत्तीची रक्कम जमा होणे,जेष्ठ नागरिकांच्या पेन्शन योजना, शासकीय निराधार योजना, शासनाच्या सबसिडी योजना आदीकामी आधारकार्डची आवश्यकता आहे़ त्यामुळे सध्या बंद असलेले विक्रमगड तालुक्यासाठीचे आधार केंद्रे सुरु करावे़-निलेश भगवान सांबरे, सामाजिक कार्यकर्ते, विक्रमगडसर्वच कामा करीता आता आधारकार्ड लिंक केले जात आहेत. परंतु पूर्वी ज्यांनी आधारकार्ड घेतलेले आहे़ त्यावर अनेकांच्या जन्म तारखा या अर्धवट असल्याने व अनेकांचे हातांच्या बोटांचे अंगठे(ठसे) आॅनलाईनला लिंक होत नसल्याने अडचणी उद्भवत आहेत़ याकरीता त्यांना आता नविन आधारकार्ड काढण्याशिवाय पर्याय नसल्याने विक्रमगडला पुन्हा आधारकार्ड केंद्र सुरु करावे़-अमोल सांबरे, सुशिक्षित बेरोजगार
विक्रमगडचे आदिवासी आधारकार्डापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:40 AM