वसई : वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात प्रतिनियुक्तीवर नगर अभियंता म्हणून रुजू झालेले आणि पुढे बढती घेत उपसंचालकपदापर्यंत पोहोचून दहा वर्षे पालिकेतच तळ ठोकलेले वादग्रस्त संजय जगताप यांना अखेर नवनियुक्त आयुक्त गंगाधरन देवराजन यांनी कार्यमुक्त करीत ‘दे धक्का’ दिला आहे. आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांना दिलेला हा तिसरा धक्का ठरला आहे.आयुक्त गंगाधरन देवराजन यांनी मागील आठवड्यात प्रभाग समितीवरील दोघा सहाय्यक आयुक्तांना डच्चू देत पुन्हा त्यांच्या मूळ लिपिकपदावर पाठवून पहिला धक्का दिला होता. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गैरहजर राहणाºया तिघांवर निलंबनाची कारवाई केली होती. आता आयुक्तांनी नगररचना उपसंचालक संजय जगताप यांना कार्यमुक्त करीत पालिका व सत्ताधाऱ्यांना तिसरा धक्का दिला आहे. यामुळे आलबेल कारभाराला लगाम घालून पालिकेच्या घडीला नीट बसविण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेला आयुक्तांनी खºया अर्थी सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.पालिकेतील एक बडे ‘गेमचेंजर’ म्हणून नेहमीच वादग्रस्त ठरलेले नगररचना उपसंचालक संजय जगताप हे दहा वर्षांपूर्वी तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपरिषदेत ‘सॅटेलाईट सिटी’ उपक्रमाअंतर्गत नगर अभियंता म्हणून प्रतिनियुक्तीवर रुजू झाले होते. महापालिकेत ते नगररचना उपसंचालक या महत्त्वाच्या पदावर असल्याने दरवेळी त्यांना सत्ताधाºयांकडून अभय मिळत राहिले.>नगरपालिका गेली आणि वसई-विरार शहर महापालिका अस्तित्वात आली, तरीही जगताप पालिकेच्याच सेवेत राहिले. खरे तर शासनाच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ हा जास्तीत जास्त सात वर्षांचा असतो. मात्र, दरम्यानच्या काळातदेखील जगताप यांच्या मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी बदल्याही झाल्या. मात्र दरवेळी त्यांनी मंत्रालयातून बदली रद्द करून घेत स्वत:ची एक ‘गेमचेंजर’ अशी ओळख निर्माण केली होती.
वसई-विरारचे नगररचना उपसंचालक कार्यमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:36 AM