- सुरेश काटेतलासरी - परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी नगरपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे.तलासरी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाच कोटी रु पयांची योजना मंजूर करून ती तयार करण्यात आली योजना वर्षा पासून तयार असून तलासरी नगर पंचायत व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या समन्वया अभावी पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन न जोडल्यामुळे जनता पाण्यापासून वंचित आहे. निकुंभ यांनी लोकांची गैरसोय लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू न केल्यास १ मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एक महिन्या पूर्वी नगर पंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करून ग्रामीण रु ग्णालयाला नळ कनेक्शन दिले परंतु थोड्याच अवधीमध्ये ती लाईल जागोजागी फुटल्याने पुरवठा बंद झाला. त्यामुळे जोडणीचे काम निकृष्ट झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.फुटलेले पाईप दुरु स्त करण्यात येत असून, नळ कनेक्शनसाठी अर्ज घेऊन कनेक्शन देण्यात येत आहेत.- सागर साळुंखे, मुख्याधिकारी,पाणी पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने नळ कनेक्शन देण्यात विलंब होत आहे.- स्मिता वळवी, नगराध्यक्ष२५ एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त कनेक्शन देण्याचा प्रयत्न आहे.- आर. ए. पाटील,उपअभियंता, पाणीपुरवठा
पाणी असूनही टंचाई, तहानलेली तलासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:25 AM