पालघर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराने या जिल्ह्यातील सुमारे तीस हजार शेतकऱ्यांंच्या सात हजार हेक्टर लागवडीखालील कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस व त्यामुळे आलेल्या पुरामध्ये या क्षेत्रावरील भातपीक, बागायती आदीं क्षेत्र अनेक दिवस पाण्याखाली राहिल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी क्षेत्राने पूर्ण केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकºयांंना भरपाई देण्यासाठी ६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र हे लागवडीचे क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार ००१ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. भात पीक लागवडी साठी एकूण ७६ हजार ३८८ क्षेत्रा पैकी ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तर ११ हजार २०५ हेक्टर क्षेत्रा पैकी ११ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर नागली च्या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. ह्या प्रत्यक्ष एकूण लागवडीच्या क्षेत्रातील ७ हजार २२० हेक्टर क्षेत्रातील भातपीक, नागली व अन्य बागायती क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक के बी तरकसे यांनी लोकमत ला दिली.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून पंचनाम्यानुसार शेतकºयांंच्या या नुकसान भरपाईच्या मागणीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित केला असल्याचे तरकसे यांनी सांगितले. यासाठी शासनाकडे सुमारे ६ कोटींची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये कोरडवाहू भात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकºयांंना ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टरी तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ८०० रु पये प्रति हेक्टरी भरपाई शेतकºयांंना मिळणार आहे. ज्या शेतकºयांंनी पिक विमा योजना चा लाभ घेतलेला आहे. अशा शेतकºयांंना पिक विमा योजनेअंतर्गत भरपाई देण्यात येणार असून पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकºयांंनाही त्यांची भरपाई नेमून दिलेल्या नुकसानीच्या प्रमाणात देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक भात पिकांचे नुकसान झाले आहे. बागायती क्षेत्राचे यामध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान वाडा तालुक्यातील असून या तालुक्यातील लागवडीखालील असलेल्या क्षेत्रापैकी ४ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. वसई तालुक्यातील १ हजार, जव्हार तालुक्यातील १ हजार, मोखाडा तालुक्यातील ७०० व पालघर विक्र मगड आधी तालुक्यांमधील २०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे.रक्कम पुढील महिन्यातया सर्व तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या क्षेत्राचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केलेले असून हे पंचनामे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत पुण्याच्या कृषी आयुक्तांच्या कार्यालयात पाठविण्यात आलेले आहे कृषी आयुक्त यांचा अहवाल राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असून यासाठी जिल्ह्यात झालेल्या नुकसान भरपाईसाठी ६ कोटींची मागणी करण्यात आलेली आहे. ही रक्कम पुढील महिन्यात जिल्ह्याला मिळणे अपेक्षित आहे.