शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘पालघर जिल्हा गुजरातला जोडण्यासाठी वेगळं षडयंत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:36 AM

मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे

पंकज राऊतबोईसर : मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे अशी भीती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोईसर येथे व्यक्त करून वेळीच जागे व्हा असे, आवाहन केले. तसेच जिंदालच्या नियोजित नांदगांव आलेवाडी बदराच्या विरोधात भूमिपुत्रा सोबत खंबीरपणे राहीन असे आश्वासन नांदगाव येथे जाऊन दिले.आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेस चालना देण्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मंगळवार (दि १ मे) पासून त्यांनी राज्य व्यापी दौरा वसईपासून सुरू केला त्याचा आज दुसरा दिवस होता. वसई येथील प्रचंड जनसमुदायांच्या उपस्थितीत दौऱ्यावरील पहिल्या व शेवटच्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे यांनी तारापूर एमआयडीसी मधील हॉटेल रियांश ग्रँट येथे वास्तव्य केले.बुधवारी सकाळी ८:३० पासून सिटीझन फोरम आॅफ बोईसर -तारापूर या सामाजिक संघटना, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस विरोधी संघर्ष समिती, सूर्यापाणी बचाव समिती, जेष्ठ नागरिक बंधू भगिनी मंडळ, प्रेरित फाउंडेशन बोईसर यांच्या पदाधिकाºयांशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पालघर पोट निवडणुकीत भाजपाविरोधी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.जिंदाल (जेएसडब्ल्यू) नांदगाव - आलेवाडी बंदर विरोधी संघर्ष समितीचे सदस्य, नवापुर, मुरबे, आलेवाडीचे सरपंच, भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी यांचे कडून बंदर उभारणीनंतर उद्भवणाºया समस्या व उध्वस्त होणारे संसार आणि जीवन या संदर्भात खरी वस्तुस्थिति जेथे नियोजित बंदराची जागा आहे त्या भागात राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन समजून घेऊन प्रस्थावित बंदराला स्थानिकांच्या मनातील खदखदणारा असंतोष व प्रचंड विरोधाची भूमिका पाहून जिंदाल व्यवस्थापन लोकांना फसवत असेल तर तुमचा लढा चालू असुद्या मी तुमच्या सोबत खंबीरपणे राहीन असे सांगितले. त्या वेळी त्यांच्या सोबत नितिन सरदेसाई, बाळा नांदगांवकर, अमित ठाकरे, कुंदन संखे, समीर मोरे, धीरज गावड आदी नेते उपस्थित होते.बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, कारिडॉर हे विनाशकारी प्रकल्प उभारून पालघर जिल्हा प्रथम गुजरातशी जोडून नंतर गिळकृत करण्याचा कुटील डाव असल्याचे सांगून मुंबईवर गुजरातशी संलग्न करण्यासाठी तसेच मुंबईवर ताबा मिळविण्यासाठी प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातशी जोडले जाईल हे त्यांनी ठासून सांगितले.तारापूर औद्योगिक पट्ट्यात स्थानिकांना न मिळणारा रोजगार, नांदगाव व वाढवण बंदराला स्थानिकांचा व मच्छीमारांचा असलेला प्रखर विरोध, डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवाशांच्या समस्या, ओएनजीसी सर्वेक्षणाचा मच्छीमारांना बसणारा फटका आदी विषयांवर त्यांनी आपले म्हणने मांडले.पालघर जिल्हा सिडको नवनगर मधील गैरप्रकार, जिल्हाधिकारी यांचा मनमानी कारभार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासीचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर, शौचालय व दुर्गम भागातील वीज पुरवठा व समस्या, जिल्ह्यातील आरोग्य सेवेची झालेली धूळधाण आदी विषयावर चर्चा केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या अडी-अडचणी तसेच पक्षसंघटना बांधणीच्या दृष्टीने त्यांनी चर्चा केली.