नालासोपारा - सांडोर येथील जमीन घोटाळ्यात ४६ आरोपींवर गुन्हे दाखल होऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले असताना, या जमीनीच्या मूळ मालकाचा शोध घेतला असता धक्कादायक वस्तुस्थिती हाती आली आहे. तक्रारदार मायकल प्रधान हा ५ एकर २९ गुंठे ही जागा फरेरा कुटुंबीयांची असल्याची सांगत असला तरी यातील ३ एकर २४.५ गुंठे जमीन वासळई येथील कै.मुकुंद हरी पाटील यांनी ब्रिटीशकाळात सब रजिस्ट्रार वसई येथे नोंदणी केल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत.कै. मुकुंद हरी पाटील यांनी १९४२ साली खरेदीखताने सांडोर सर्व्हे नं.१५८/१ जुना १६४/१ (नवीन) ही जमीन मूळ मालक गुलाम हुसेन मामदू नाकर तसेच इतर दोन हिस्सेदारांकडून ब्रिटीशकाळात खरेदी करून वसई सबरजिस्ट्रार यांच्याकडे दस्तक्र मांक १०८५ ने दिनांक २०/१०/१९४३ साली नोंदविली होती. असे कै.मुकुंद हरी पाटील यांचे नातू राजेश अनंत पाटील यांनी आपल्याकडील उपलब्ध कागदपत्राद्वारे सांगितले. मात्र तक्रारदार मायकल प्रधान याने त्यांच्याकडे गटबुक उतारे, सातबारा माहिती हि १९५२ ते २०१७-१८ पर्यंतची कागदपत्रे हाती आली असल्याचे सांगितले होते.त्यात फेरफार नं.६३ प्रमाणे बदल होऊन ती जागा ११.५ गुंठे असतांना ती १४६.३ गुंठे जमीन कै.मुकुंद पाटील, जयवंत पाटील व कुटुंबियांच्या नावे असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध कागदपत्रानुसार सन 1950 ला जुनू दुमजी फरेल यांचे संरक्षित कुळ म्हणून फेरफार क्रमांक ६३ ने नाव दाखल झाले होते. मात्र जुनू फरेल व तक्रारदार मायकल प्रधान यांचा आजोळचा दूरान्वयानेही संबंध नसल्याचे समोर आले आहे. जुनू फरेल यांचे नातू डॉमनिक फरेल हे सध्या या जागेत वास्तव्यास आहेत. या जागेतील काही भागावर हिस्सेदारांच्या परवानगीने वेगवेगळ्या विकासकांनी बांधकामे करून सदनिका विक्र ी केलेल्या आहेत. आजही कै.मुकूंद हरी पाटील यांच्या नावे ३२ गुंठ्याचा सातबारा असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. तसेच महसूली दप्तरी आजपर्यंतचा पाटील कुटुंबीयांचा सातबारा अस्तित्वात आहे. याबाबत तक्र ारदार मायकल जॉन प्रधान याच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.मायकेल प्रधान विरुद्ध पूर्वी गुन्हा दाखलमायकल प्रधान याच्याकडे सन १९५२ अगोदरचे सातबारे उतारे किंवा खरेदीखत उपलब्ध नसतांना १९४३ ला सब रजिस्ट्रार वसई यांच्याकडे नोंदणी करून जमीन नावावर केलेल्या कै.मुकुंद हरी पाटील यांचे नातू राजेश अनंत पाटील यांनाही आरोपी केले आहे. मायकल प्रधान याच्यावरही याअगोदर एका प्रकरणात पोलीस दप्तरी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.तसेच इतर ४६ आरोपींपैकी शैलेश तोरणे या व्यक्तीचा काडीमात्र संबंध नसताना त्यालाही या प्रकरणात ओढले गेले आहे.तीन एकर साडेचोवीस गुंठे जागेचे खरेदीखत हे आमच्या पाटील कुटुंबियांच्या मालकिचे असून सन 1942 सालच्या खरेदीखताने नोंदणीकृत करण्यात आलेली आहे. मात्र तक्र ारदाराने वैयक्तिक सूडापोटी व लालसेपोटी आमच्यावर चिखलफेक केली आहे.- राजेश अनंत पाटील,विद्यमान सातबारा धारकआम्ही फक्त हे प्रकरण न्यायाच्या द्रुष्टीने पहात होतो. बांधकाम परवानगीच्या स्थगितीबाबत सुनावणीसाठी महापालिकेचे झाल्याबद्दल आमच्यावरही गुन्हे नोंदवून आम्हाला आरोपी केले आहे.-अँड.रमेश घोन्साल्वीस, वसई
घोटाळ्याला वेगळे वळण, हाती आले आणखी जुने दस्तऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 2:41 AM