शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

भातपिकांना रोगांची लागण; सततच्या पावसामुळे भातशेतीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:36 AM

तालुक्यातील कासा, वाणगाव भागात पावसाळ्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

कासा : तालुक्यात शेतकऱ्यांचा भातशेती हा प्रमुख व्यवसाय आहे. डहाणू तालुक्यातील कासा भागात भातपिकाला रोगाची लागण झाली आहे. ही लागण वेळीच आटोक्यात न आल्यास भातशेतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील कासा, वाणगाव भागात पावसाळ्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या हळव्या भातशेतीची कापणी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तर गरव्या भात शेतीची कापणी आॅक्टोबर महिन्याअखेरीस केली जाते. मात्र, सततच्या पावसामुळे शेतजमीन ओलीच रहात असल्याने भात पिकांवर रोगाची लागण झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. सातत्याने झालेल्या पावसामुळे येथील शेतजमीन ओलिताखाली राहिल्याने वेगवेगळ्या प्रकारचे गवत, बांडभूर लवाके असे तणही मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यात सध्या हळव्या भात शेतीची कापणी काही शेतकºयांनी केली आहे. हळवी भात दाण्यांनी भरली आहेत. मात्र वादळी पावसाने पिके शेतात पडली असून पिकावर बगळ्या आणि तुडतुड्या रोग पडला आहे. काही शेतकºयांचे पूर्ण शेतच पांढरे झाले आहे, त्यामुळे भाताच्या रोपाची वाढ खुंटली आहे.कासा, वाणगाव, सायवन भागातील शेतकरी आदिवासी तसेच गरीब असल्याने बºयाच शेतकºयांकडे फवारणी यंत्रे नाहीत. त्यामुळे या शेतकºयांना शासनाच्या कृषी विभागाकडून फवारणी यंत्रे व औषधे, कीटकनाशके मोफत दरात किंवा अनुदानातून पुरविण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.परतीच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसानविक्रमगड : तालुक्यात सध्या परतीचा पाऊस आणि आॅक्टोबर महिन्यातील कडक ऊन असे चित्र आहे. कधी मेघगर्जनेसह तर कधी विजेच्या कडकडाटानंतर येणारा पाऊस हा भात पिकाला धोका होऊन नुकसान देणारा ठरत आहे. दोन - तीन दिवसांपासून सायंकाळी पावसाचा जोर असतो. वारा पावसामुळे उभे असलेले हे भात पीक पूर्णपणे झोपून जाण्याची भीती आहे. सध्या भात पीक तयार झाले असून शेतकरी कापणीच्या तयारीत आहे. परंतु दररोज येणाºया पावसामुळे शेतकरी भात कापून ठेवत नाही. परिणामी, शेतकºयांचे दोन्ही कडून नुकसान होते आहे. तालुक्यात ८५६ हेक्टरवर भात शेती केली जाते. भात हे मुख्य पीक असून या भातावर शेतकरी अवलंबून असतो. सध्या हळवा भात पीक कापणी योग्य झाला आहे. परंतु या पावसामुळे भात कापला जात नसल्याचे शेतकरी रणधीर पाटील यानी सांगितले. तालुक्यात भात चांगला आला असला तरी परतीचा पाऊस धोका देतो का अशी अवस्था आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.खाचरात पाणी असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढलीडहाणू/बोर्डी : भात पीक कापणीच्या हंगामाला दसºयाच्या शुभ मुहूर्तावर प्रारंभ झाला आहे. मात्र खाचरांमध्ये ओलावा तर काही ठिकाणी पाणी असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. पिकाचे नुकसान होण्यासह, कापलेल्या भाताला सुक्या जागेवर नेताना अधिकचे मजूर खर्ची होत असून आर्थिक झळ बसत आहे. डहाणू तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते.येथील भात उत्पादक साधारणत: हळवे आणि निमगरव्या वाणांची लागवड करतात. बारमाही पाण्याची सोय असलेले शेतकरी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर धुळपेरणीस प्राधान्य देतात. त्यामुळे दसºयापूर्वीच भात पीक कापणीला येते. या वर्षी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत वारा आणि पाऊस झाल्याने काही भागात उभी पिके आडवी होऊन दाणे भिजले आहेत.तर समुद्रकिनाºयापासून सुमारे १५ किमी अंतरवारील खलाटी आणि त्यापुढील वलाटी क्षेत्रातील खाचरांमध्ये पाणी असून बहुतेक भागात जमिनीत ओलावा आहे. शिवाय ९ ते ११ आॅक्टोबर या काळात परतीच्या पावसा बाबतचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या प्रखर ऊन आणि वातावरणात उष्णता असल्याने जेवढी कापणी उरकता येईल त्याकडे शेतकºयांचा कल आहे.दसºयाचा मुहूर्तावर भात कापणीला सुरु वात करण्यात आली असून सण असल्याने मजुरांची उपलब्धता कमी आहे. पुढील काळात एकाच वेळी या कामाला प्रारंभ होऊन कापणी मजुरांचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे मजुरांचे बुकिंग करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.या तालुक्यात दसºयाचा मुहूर्त हा भात कापणीकरिता साधला जातो. मात्र एकाच दिवशी हंगामाचा प्रारंभ होत असल्याने मजुरांचा तुटवडा भासू नये म्हणून सणाच्या एक दोन दिवस आधी सुरु वात केली जाते. काही भागात खाचरत पाणी असून बºयाच क्षेत्रातील जमीन ओली आहे. परतीचा पाऊस झाल्यास त्याचा फटका कापणीला आलेल्या पिकाला बसू शकतो.विजय किणी, भात उत्पादक शेतकरी

टॅग्स :palgharपालघर