- अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी : पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्यानंतर त्यांचे गंजाड गावातील पस्तीस वर्षीय शिष्य अनिल वांगड यांना पॅरिस आर्ट गॅलरीत महिनाभर वारली पेंटिंग लावण्याचा बहुमान मिळाला आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांकडून त्यांच्या या चित्रांना खास पसंती मिळाली आहे. तर वारली चित्रशैलीतून साकारलेला आयफेल टॉवर तिथल्या भारतीय दूतावासाला भेट दिल्याची माहिती त्यांनी थेट पॅरिसहून लोकमतला दिली.वारली चित्राकर पद्मश्री म्हसे यांच्या प्रमाणेच अनिल वांगड यांनी इंडोनेशिया तर्फे दिल्या जाणाºया वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल या आंतरराष्ट्रीय पुरस्कारवर नाव कोरलेले आहे. त्यानंतर म्हसे यांच्या चित्रासह वांगड यांची चित्रं अनेक देशातील प्रदर्शनात लागल्यावर युवा वारली चित्रकार म्हणून त्यांची ओळख जगाला झाली. त्यानंतर त्यांना सिंगापूर, चीन, बेल्जियम, तैवान, अमेरिका, दक्षिण कोरिया, जर्मनी आणि इटली आदि राष्ट्रांच्या दूतावासांकडून ट्रायबल कला प्रदर्शनात त्यांची वारली चित्रे झळकली.दरम्यान म्हसे यांच्या मृत्यूनंतर १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१८साली पॅरिस येथे भरलेल्या दुप्पाट्टा असोसिएशन, गॅलरी ५९, रायवोली प्रदर्शांनकरिता भारतीय दुतावासाने वांगड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भारतीय सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून येण्या-जाण्याच्या प्रवास खर्चाची तरतूद झाल्यानंतर त्यांना तिथपर्यंत पोहचता आले.येथे जिव्या म्हसे यांनी बनवलेली सर्वाधिक वारली पेंटिंग हार्वे पेड्रीओली या फ्रेंच कला रसिकाने खरेदी केली आहेत. येथे एका कॉन्फरन्सच्या माध्यमातून म्हसे व वांगड यांच्या कलेविषयी माहिती जाणून घेण्याकरिता कॉन्फरन्स घेतली. तर येथील भारतीय दूतावासात प्रेझेंटेशन पार पडले. त्यावेळी वारली चित्रशैलीतून जगप्रसिद्ध आयफेल टॉवर चितारलेले पेंटिंग दूतावासाला भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. वांगड हे म्हसे यांच्या मुशीतून डहाणूतील गंजाड या गावातच घडलेले आदिवासी पारंपारिक वारली पेंटर आहेत. शिवाय त्यांनी आजच्या युगाचे नवीन विषय त्यांच्या कुंचल्यातून साकारले आहेत. त्यामध्ये बेटी बचाव, बेटी पढाव, पानी बचाव तसेच गौतमबुद्ध व महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र त्यांनी या शैलीतून साकारले आहे. वारलीपेंटिंग आणि एकूणच भारतीय संस्कृतीविषयी येथल्या रसिकांना विशेष स्वारस्य असून त्याबद्दल जाणून घ्यायला ते उत्सुक असतात. त्यांना म्हसे यांची चित्रं फारच प्रिय आहेत. आपली चित्रंही आवडल्याने, त्यांनी ती विकत घेतल्याचे वांगड म्हणाले. दरम्यान हा अविस्मरणीय अनुभव असल्याची भावना त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.हा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. येथील प्रदर्शनात मांडलेली चित्रं आण ित्या गोष्टींबद्दल रिसकांना कमालीची उत्सुकता असून चित्र खरेदीकडे त्यांचा कल जास्त आहे. येथे आलेले अनुभव देशात परतल्यावर येथील कलाकारांना सांगणार आहे. म्हसे यांच्यामुळे हे वैभव वारली चित्रकलेला प्राप्त झाल्याची अनुभूती थक्क करणारी आहे.
वारली चित्रकार अनिल वांगड यांची पेंटींग्ज पॅरिस येथील प्रदर्शनात महिनाभर प्रदर्शित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:02 PM