विक्रमगड : तालुक्यातील जि.प.च्या २३६ शाळांच्या गुणवत्तेची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या मध्ये पटसंख्या, शैक्षणिक साहित्याचे तसेच पाठ्य्पुस्तकाचे वाचन, गणित, शालेय पोषण आहाराची स्थिती, भौतिक सुविधा, इमारत, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, संरक्षक भिंत, शाळाबाह्य मुलांची संख्या आदींची आकडेवारी व दर्जा अहवालत नमूद करण्यात येत आहे. यावरच शाळेची गुणवत्ता ठरणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना यांचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर योग्य ती कार्यवाही होईल. (वार्ताहर)
जि. प. शाळांची तपासणी
By admin | Published: February 15, 2017 3:04 AM