हुसेन मेमन जव्हार : स्वच्छ भारत अभियानाचा वसा जपत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारत अभियानात सहभाग घेत जव्हार शहराला लागून असलेल्या शिरपामाळ या पवित्र पर्यटनस्थळाची स्वच्छता दिव्य विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी हे नेहमीच राखत आहेत.जव्हार शहराला लागून असलेले शिरपामाळ या थंडगार पर्यटनस्थळावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. येणाऱ्या पर्यटकांकडून खाऊच्या पुड्यांचे रॅपर्स, गुटखा, तंबाखू, चॉकलेट व इतर घाण कचरा टाकला जातो. या पवित्र पर्यटनस्थळाची स्वच्छता राहावी म्हणून दिव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पर्यटनस्थळाची नेहमीच स्वच्छता करीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ हा पवित्र परिसराची स्वच्छता महिन्यातून किमान चार वेळा हे विद्यार्थी करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने विशेषत: इथे येणाºया पर्यटकांनी करणे आवश्यक आहे. अशी स्थानिकांची भावना आहे, परंतु हे लक्षात घेणार तरी कोण? हा प्रश्न आहे.