शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊच नका - निधी चौधरी

By admin | Published: June 15, 2017 2:29 AM

जिल्ह्यातील ६४ शाळा अनधिकृत पणे चालवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जीवघेणा खेळ खेळला जात असून शिक्षण विभाग या अनधिकृत शाळा विरोधात कारवाईच्या नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील ६४ शाळा अनधिकृत पणे चालवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जीवघेणा खेळ खेळला जात असून शिक्षण विभाग या अनधिकृत शाळा विरोधात कारवाईच्या नोटिसा बजावत असतांना वरिष्ठ पातळी वरून मात्र या कारवाईला स्थगिती दिली जात असल्याने शिक्षण विभाग हतबल ठरत आहे. ह्या पार्श्वभूमीवर अशा अनधिकृत शाळां मध्ये पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हापरीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ६४ शाळा अनिधकृत असल्याचे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले असून त्यातील ४३ शाळा या एकट्या वसई तालुक्यात आहेत. तर जव्हार तालुक्यात एक,पालघर तालुक्यात ११,विक्र मगड तालुक्यात ४, वाडा तालुक्यात ५ शाळा आहेत.ह्या ६४ शाळा मधील अनेक शाळा अनधिकृतपणे चालविल्या जात असल्याचे शिक्षण विभाग वरिष्ठ पातळीवर कळवत असले तरी त्या शाळांवर कारवाई करण्यासाठी उगारलेले हात मात्र मध्येच छाटण्याचे काम मंत्रालयीन पातळीवरील अधिकारी करीत आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग जरी ह्या शाळा अनधिकृत म्हणून प्रत्येक वर्षी घोषित करीत असले तरी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने हा आकडा प्रत्येक वर्षागणिक वाढतच चालला आहे. या अनधिकृत शाळांमध्ये गरीब, झोपडपट्टीत राहणारी कुटुंबे आपल्या मुलांना घालीत असल्याने त्यांच्या पुढे अनेक शैक्षणिक समस्या उभ्या राहत आहेत. तर दुसरी कडे या अनधिकृत शाळेचे संस्थाचालक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा दहावीच्या परिक्षेसाठी इतर शाळा मार्फत बसवून पालकांची दिशाभूल करीत असतात. बोईसर भागात असलेल्या अनेक अनधिकृत शाळा मधील शिक्षक वर्ग हा उच्चशिक्षित नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले असून त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर होत असतो. त्यामुळे या शाळांमध्ये कुणीही प्रवेश घेऊ नये असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश कंकाळ यांनी केले आहे.