बोईसर : चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी कुणी गेले नाही परंतु निवडणूक लागताच एका बाजूला आमच्याशी चर्चा तर दुसºया बाजूला श्रीनिवास ला प्रवेश देऊन अश्रूमध्ये राजकीय संधी शोधणाºया ना जनता माफ करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर टीका करतांना सांगितले.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी बोईसर येथील सर्कस मैदानावर जाहीर सभा घेतली यावेळी गावितांसह आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटन आणि रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल केंद्रीय समाज कल्याण, राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील व गोपाळ शेट्टी, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, कॅबिनेट मंत्री राज पुरोहित, भाजप मुंबई प्रदेश चे अध्यक्ष आ.आशिष शेलार,आमदार किसन कथोरे, मनीषा चौधरी, पराग आळवणी, प्रविण दरेकर, भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष आ .पास्कल धनारे, कामगार नेते विजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.बाळासाहेबांच्या शिवसेनाविषयी बोलताना ते म्हणाले की, ती शिवसेना वार करायचा असेल तर छातीवर करायची पाठीवर नाही उद्धव ठाकरे ही कोणती शिवसेना तुम्ही तयार केली असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.या विषयांना बगल...मुख्यमंत्र्यांनी बुलेटट्रेन, वाढवण बंदर, जिंदाल जेटी, सुपर हायवे या जिल्ह्यातील नियोजित प्रकल्पांचा उल्लेख टाळला.मात्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर व समृद्धीच्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण करीत असून मोदींचे हात बळकट करा असे सांगितले.
अश्रूंमध्ये राजकीय संधी शोधणाऱ्यांना माफी नाही- देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 2:48 AM