- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : १२ एप्रिल रोजी विरार लोकल ला १५२ वर्ष पूर्ण झाल्याचा मुहूर्त साधून या लोकलने प्रवास करणाऱ्या मतदारांची स्थानिक प्रश्नांविषयीची मते मतांतरे आणि त्यांना उमेदवाराविषयीच्या अपेक्षा याचा लोकमतने नुकताच आढावा घेतला.पालघर लोकसभा मतदार संघामध्ये डहाणू, बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्यातून पश्चिम रेल्वे धावते. थेट डहाणू रोडपर्यंत लोकल धावू लागल्याने या भागाचा समावेश उपनगरीय रेल्वेत होऊ लागला असतांना शहरी आणि नागरी अशा संमिश्र समस्या निर्माण झाल्याने, येणाºया शासनाकडून त्यांची सोडवणूक व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. डहाणू रोड ते वसई आणि वसई ते डहाणू रोड या दरम्यान थेट धावत्या लोकलमधून या प्रवाशांशी बातचीत केली असता, त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपास्थित केले. यावेळी व्यवसायाने सिव्हील इंजिनियर असलेला आशिष राऊत म्हणाला कि, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा उत्तम प्रकारे सांभाळली आहे. काही मुद्दे दुर्लक्षिले गेले असले तरी त्यांच्या कार्यपद्धतीने युवकांना प्रभावित केले आहे. तर डहाणूतील धुंदलवाडी नजीकच्या शिसने या आदिवासी गावचा रहिवासी असलेला माह्या दळवी म्हणाला कि आम्ही मागील पाच-सहा महिन्यांपासून भूकंपाचे शेकडो धक्के सहन करतो आहोत. त्यामुळे परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी निम्म्या लोकांना पाच ते सहा हजाराची तुटपुंजी मदत मिळाली असली, तरी आजही लाभापासून वंचितांची संख्या अधिक आहे. पावसाळा जवळ आला असताना आम्ही मोकळ्या मैदानातील तंबूत किती दिवस राहायचे. मात्र डहाणू-तलासरी या तालुक्यातील अनेक गावं प्रभावित असतांना कोणत्याच राजकीय पक्षाकडून त्यांची दखल घेतली जात नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. तर वसई येथील निर्मळ या तिर्थक्षेत्राचे रहिवासी हिराजी रामचंद्र गावड सांगतात, कि मतदार संघाची पुनर्रचना होऊन पालघर नवीन मतदार संघ निर्माण झाला. त्यामुळे पूर्वीच्या मतदार संघा ऐवजी वसई-विरारचा समावेश झाल्यानंर येथील शहरी समस्यांबाबत या अन्य पक्षांपेक्षा बहुजन विकास आघाडीचे काम बरे असून भाजपाच्या दोन्ही खासदारांची कामिगरी त्यामुळे डावी ठरताना दिसते.डहाणू रोड ते विरार लोकल प्रवासयावेळी वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, ओएनजीसीचे समुद्रातील सर्वेक्षण, समुद्रातील मासेमारी हद्दीचा वाद, एमआयडीसीची समुद्रात सोडलेली प्रदूषित पाण्याची पाईपलाईन बुलेट ट्रेन, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, मुंबई वडोदरा एक्स्प्रेसवे बेकायदेशीर सर्व्हे, तसेच विविध प्रकल्पांकरिता जमीन अधिग्रहण, कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन, सीआरझेड, सूर्या धरणाचा पाणी प्रश्न, कुपोषण अशा मुद्द्यांवर मतदारांनी आपली मते व्यक्त करून येणाºया शासनाकडून भूमिपुत्रांवर कोणतेही प्रकल्प लादण्यात येऊ नयेत शिवाय जिल्ह्यातील विविध समस्या प्राधान्याने सोडावाव्यात असे मत व्यक्त केले.महायुती आणि महाआघाडीत जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पक्ष विभागले गेल्याने सेनेचे गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.एक लाख कोटीची बुलेट ट्रेन साकारण्यापेक्षा डहाणू ते मुंबई या लोकल सेवेचा विकास ५ हजार कोटी रु. खर्चून करण्यास प्राधान्य द्यावे, कारण बुलेट ट्रेन मुठभरांसाठी तर लोकल २५ लाख प्रवाशांसाठी आहे, असे प्रवासी म्हणाले
बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा; रेल्वे प्रवाशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:18 AM