नालासोपारा : वसईत ९ ते १२ जुलैदरम्यान मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मानवनिर्मित पूरस्थिती याला कारणीभूत असल्याने यावर्षी जनतेच्या कररूपातून जमा झालेला पैसा महापौर मॅरेथॉनवर खर्च न करता तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा असे निवेदन पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी आयुक्त सतिश लोखंडे यांना दिले आहे.जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपुर्ण वसई तालुक्यात पुरसद्दृश परिस्थिती निर्माण झाली होती. सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी जमून त्यांचे संसार उघड्यावर आलेत. अनेकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वसईकर अजुनही या मानसिक धक्क्यातून सावरलेली नाहीत. महापालिका दरवर्षी महापौर मॅरेथॉनवर करोडो रूपये खर्च करीत असते. वसईत अशी गंभीर समस्या असतांना महापालिकेने किमान यावर्षी तरी महापौर मॅरेथॉन स्पर्धा नये. जर महापौर मॅरेथॉन स्पर्धा घेतली तर तो जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार ठरेल असे वसईतील पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी सांगितले आहे.पूरग्रस्तांना द्या तो निधीजनतेच्या कररूपातून जमा करण्यात आलेला पैसा यावर्षी मॅरेथॉनवर खर्च न करता तो पुरग्रस्थांना मदतीसाठी माणूसकी म्हणून देण्यात यावा असेही आवाहन त्यांनी महापालिका आयुक्त सतिश लोखंडे यांना केले आहे.
वसई महापौर मॅरेथॉन यावर्षी घेऊच नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:33 PM