बोर्डी : महाराष्ट्र-गुजरात या सागरी सिमेमध्ये अतिक्र मण करून कव पद्धतीच्या मासेमारीद्वारे वसई, उत्तन आणि अर्नाळा येथील मच्छिमारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे संघर्ष पेटला असून तो सामोपचाराने सोडविण्यासाठी गुरु वारी दुपारी झाई गावात सभेचे आयोजन केले होते. या करीता पालघर, ठाणे तसेच गुजरात, दमण येथील मच्छिमार सोसायट्यांचे पदाधिकारी व या व्यावसायातील कुटुंबियांनी हजेरी लावली होती. त्याचे आयोजन येथील मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटी आणि मांगेला समाज मच्छीमार सोसायटीने संयुक्तरित्या केले होते.१९७८ सालापासून या पद्धतीच्या मासेमारीचा वाद वसई, उतन, अर्नाळा आणि सातपाटी ते थेट दमण पर्यंतच्या मासेमारांमध्ये सुरू आहे. १९८३ साली हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी सामाजिक बंधने घातली गेली. त्यानुसार ठरवलेल्या हद्दीनुसार सामाजिक बंधने पाळण्याची अट दोन्ही बाजूने स्वीकारण्यात आली. परंतु आर्थिक फायद्यासाठी वसई आणि परिसरातील मच्छिमारांनी ती झुगारून दिल्याने २००५ आणि २००७ या काळात जिल्हास्तरावर सल्लागार समितीची स्थापना करण्यात आल्यानंतरही समस्या न सुटल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहचले होते.व्यावसायिक स्पर्धेतूनहा संघर्ष धगधगतो आहे. या करीता प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी बाळगून जिपीएस प्रणालीची माहिती देण्याचा नवीन पायंडा पाडल्यास निराकरण होऊ शकते. येत्या आठ दिवसात सर्वांनी एकत्र यावे, अन्यथा दुर्दैवाने वैयक्तिक पातळवर लढा द्यावा लागेल असा ईशारा नॅशनल फिश फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.
हद्दीचा प्रश्न चर्चेने न सुटावा! झाई येथील सभेत सार्वमत, कव मासेमारीने मच्छीमारांतील वाद विकोपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:47 AM