शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

छापा टाकणाऱ्यांचे ‘तिकडे’ दुर्लक्ष का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:41 AM

महाराष्ट्र गुजराज राज्याच्या सीमेवर असलेल्या महामार्गावरील रिसॉर्ट व फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावरील कारवाईमुळे हा भाग चर्चेत आला

- सुरेश काटेतलासरी : महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या महामार्गावरील रिसॉर्ट व फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावरील कारवाईमुळे हा भाग चर्चेत आला असून येथील परिसरात सुरु असणाºया वेश्या व्यवसाय, विनापरवाना नृत्य, जुगार, मटका व सट्ट्यावर स्थानिक पोलीस का कारवाई करीत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.रिसॉर्ट मधील अश्लील कृत्य, दापचारी कृषी क्षेत्रातील अमली पदार्थाचा साठा, राज्यस्थान मधून तलासरीत आणले जाणारे स्फोटक पदार्थ त्याचा मनमानी वापर , दापचरी तपासणी नाक्यावर सुरू असलेला शंभर कोटींचा भ्रष्टाचार व गाड्या पास करणाºया टोळ्या, आर. टी. आ. अधिकाऱ्यांनी हाताखाली ठेवलेले गुंड, महामार्गावरील रात्रभर उघडी असणारी हॉटेल, संभा भागात पकडण्यात आलेला बनावट दारू बनविण्याचा कारखाना या मुळे तलासरी तालुका संवेदनशील बनतोय पण या कडे दुर्लक्ष आहेतलासरी महामार्गावर आच्छाड येथे असलेल्या रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे येथील सर्वच अंधेरनगरी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तलासरी पोलिसांनी बुधवारी रात्री अकरा वाजता धाड टाकून रिसॉर्ट मध्ये सुरू असलेला अश्लील प्रकाराचा पडदा फाश केला. या वेळी पोलिसांनी मुंबईतील आठ तरु णींची सुटका करुन गुजरात राज्यातील सुरत येथील नऊ ग्राहकांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती.दरम्यान, या रिसॉटमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेले कारनाम्याकडे पालिसांचा कानाडोळा का होता, आच्छाड मधील ग्रीन पार्क रिसॉर्ट हा अनेक नावे बदलून सुरू होता. कधी मंत्रा, मँगो अन् आता ग्रीन पार्क रिसॉर्टच्या नावाने ही मायानगरी सुरु होती. येथे स्थानिक ग्राहकांपेक्षा गुजरात राज्यातील ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात. नेहमी दरवाजे बंद करून चाललेल्या रिसॉर्टमध्ये स्थानिकाना फिरकूनही दिले जात नव्हते. येथे हुक्का पार्लर सुरू असल्याची चर्चा होती. तसेच, या रिसॉर्ट मध्ये तरु णीची रेलचेल दिसत असल्याने येथे सेक्स रॅकेट सुरू असल्याबाबत तक्रारी होत्या.पोलीस नियमित येथील हॉटेल व रिसॉर्टची तपासणी करतात. तशा नोंदी शासकीय कागदपत्रांमध्ये आहेत. मग, अचानक छापा मारुन कारवाई होते आणि त्या आधी सर्वकाही अलबेल सुुरु असते याचा अर्थ काही अधिकारी भ्रष्ट आहेत व त्यांच्या आशिर्वादाने हा सर्व प्रकार सरु आहे हे स्पष्ट आहे.>‘त्या’ फार्महाउसमध्ये रेव्हपार्ट्यांची शक्यतादोन वर्षांपूर्वी तलासरी पोलीस स्टेशनच्याहद्दीत असलेल्या दापचरी दुग्ध प्रकल्पातील एका कृषी क्षेत्रात लाखो रु पयांचे उच्च प्रतीचे अमली पदार्थ पकडले होत. या प्रकल्पातील कृषी क्षेत्रा पैकी काही क्षेत्रावर धनदांडग्यांनी आलिशान फार्महाऊस बांधली आहेत. त्यांचीही तपासणी होणे आवश्यक आहे.>तलासरी भागातील हॉटेल , रिसॉर्टची नियमित तपासणी करण्यात येऊन गैर आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. कुठे गैर घडत असल्यास नागरिकांनीही माहिती द्यावी.- अजय असावे,पोलीस निरिक्षक, तलासरी पो.स्टे.