शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

‘त्या’ डॉक्टरवर कारवाईसाठी दोन तास गराडा, सिव्हील सर्जनवर प्रश्नांची सरबत्ती, श्वानदंश झालेल्या मुलाला रुग्णवाहिका न दिल्याने मृत्यू झाल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:03 AM

पालघर येथील दिलखुश दिलीप मंडल (९) या श्वानदंश झालेल्या मुलाला अत्यवस्थ असतांना उपचारासाठी मुंबईला हलवतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाकारणा-या डॉ. राजेश राय यांच्यामुळे वेळीच उपचारा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पालघर  -  येथील दिलखुश दिलीप मंडल (९) या श्वानदंश झालेल्या मुलाला अत्यवस्थ असतांना उपचारासाठी मुंबईला हलवतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाकारणाºया डॉ. राजेश राय यांच्यामुळे वेळीच उपचारा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ह्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी करीत जिल्हा शल्य चिकित्सकांना त्यांच्या कार्यालयातच दोन तासभर गराडा घातला होता.पालघर कोर्टा समोरील ओस्तवाल ड्रीमसीटी मध्ये एक किराणा दुकान चालविणारा दिलीप मंडल हा आपली पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली सह रहात होता. दिलखुश हा पालघरच्या आर्यन एज्युकेशन शाळेत शिकत होता. त्याला २७ डिसेंबर ला एका कुत्र्याने चावा घेतल्या नंतर त्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात आणण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी त्याला तपासून एक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिले आणि अन्य दोन इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात पुन्हा आणण्या बाबत सूचना केल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्याला दुसरेही इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर तिसºया इंजेक्शन देण्याच्या तारखे आधी दिलखुशमध्ये रेबीज झाल्याची (हायड्रोफोबिया) ची लक्षणे दिसत असल्याने तात्काळ मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १०८ नंबरच्या रु ग्ण वाहिकेला फोन केला. त्या रु ग्णवाहिकेत उपस्थित असलेल्या डॉ. राजेश राय ह्यांनी कुत्रा चावलेल्या रुग्णासाठी ही रु ग्णवाहिका देता येणार नाही असे सांगितले. परंतु माझ्या मुलाला मुंबईच्या रु ग्णालयात तात्काळ दाखल केले नाही तर उपचारा अभावी त्याचा मृत्यू होऊ शकतो अशी विनवणी मृत मुलाच्या वडिलांनी करूनही डॉ. रॉय ह्यांना पाझर फुटला नाही. शेवटी त्यांनी खाजगी रु ग्णवाहिकेतुन त्यांनी गुजरात मधील वलसाड येथील रुग्णालय गाठले. मात्र, अधिक काळ योग्य उपचारा अभावी त्याला रहावे लागल्याने त्याला मृत्यूने गाठले. डॉ.रॉय ह्यांनी तात्काळ १०८ रु ग्णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर माझ्या मुलाचे प्राण वाचू शकले असते अशी प्रतिक्रि या त्याचे दिलीप मंडल ह्यांनी दिली. त्या मुलास तात्काळ उपचार मिळवून देण्याचा कामात हलगर्जी पणा केल्याचा आरोप करीत डॉ. राय, रु ग्णवाहिकेचा चालक व ग्रामीण रु ग्णालयातील इतर कर्मचाºयां विरोधात निलंबनाची व फौजदारी गुन्ह्याची कारवाई साठी मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे ह्यांच्या कार्यालयात शिरून त्यांना गराडा घातला.ट्रॉमा सेंटरच्या घोषणेला झाली ३ वर्षेपालघर जिल्हा निर्मितीला ३ वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतर ही आज जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या योग्य सोई-सुविधा मिळत नसल्याने त्यांना नाईलाजाने गुजरात, सिल्वासा येथील रु ग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो. ही प्रशासन आणि इथल्या लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत लांच्छनास्पद बाब असल्याची ओरड जिल्ह्यात होऊ लागली आहे.ट्रॉमा सेंटर, जिल्हारु ग्णालय उभारायच्या घोषणेला दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतर अजून त्याची एक वीट ही रचली गेली नाही. त्यामुळे दिलखुश सारख्या किती मुलांचे निष्पाप बळी इथली निष्क्रिय व्यवस्थाघेणार आहे. असा थेट प्रश्न मृत मुलाचे नातेवाईक प्रशासनाला विचारीत होते. 

टॅग्स :doctorडॉक्टरVasai Virarवसई विरार