शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

डॉक्टर ठरला दोघांच्या मृत्यूला कारणीभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 9:19 AM

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यासमोर वेणूनगर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : स्वतःच्या दवाखान्यासाठी जुन्या इमारतीतील सदनिकांमध्ये बेकायदा बदल घडवून आणत आतील भिंतीचे बांधकाम तोडल्याने वरचा स्लॅब मजुरांच्या अंगावर कोसळल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. या घटनेत माखनलाल रामवचन यादव (२६, रा. गणेश देवलनगर, भाईंदर पश्चिम) आणि कंत्राटदार हरिराम शिवपूजन चौहान (५६, रा. कृष्णदीप, नवघर मार्ग) या दोघांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, तर आकाशकुमार यादव हा जखमी आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यासमोर वेणूनगर आहे. त्याठिकाणी श्रीनाथ ज्योत इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्याच्या २ सदनिका डॉ. विनयकुमार त्रिपाठी याने घेतल्या आहेत. त्याठिकाणी एका बाजूने गाळा काढून त्यात स्वतःचा दवाखाना थाटला, दोन्ही सदनिकांमधील जुन्या भिंती, स्लॅब आदी काढून त्या एकत्र करण्याचे काम डॉक्टर त्रिपाठी याने चालवले होते. याबाबत गृहनिर्माण संस्थेने डॉक्टरला सांगूनदेखील त्याने जुमानले नाही. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग समिती ३ मध्ये सोसायटीने तक्रार केली होती. दरम्यान, रविवारीदेखील सदनिकांमध्ये तोडकाम सुरू होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास शौचालय व बाथरूमवरील पाण्याची टाकी आदी ठेवण्यासाठी असलेला स्लॅब व लगतची भिंत ही कामे करणाऱ्या मजूर आणि कंत्राटदारावर कोसळली. 

गुन्हा दाखल माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन कटरच्या साहाय्याने भिंत व स्लॅब बाजूला करत खाली अडकलेल्यांना बाहेर काढले. आयुक्त संजय काटकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कांबळे यांच्या फिर्यादीवरून डॉ. त्रिपाठी याच्यावर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

स्ट्रक्चरल ऑडिटची दिली होती नोटीसतक्रारीनंतर पालिकेने डॉ. त्रिपाठीला काम बंद करण्याची, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस दिली होती; परंतु डॉ. त्रिपाठी याने सुटीची संधी साधून काम सुरू केल्याने दुर्घटना घडून दोघांचा मृत्यू झाल्याचे कांबळे यांनी सांगितले. पोलिसांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे चौकशी करत जबाब नोंदवला. फिर्याद देताच डॉ. त्रिपाठीला ताब्यात घेतले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड